युक्रेन आहे मोठा सरोगसी हब

युक्रेन आहे मोठा सरोगसी हब

वॉशिग्टंन : रशिया करत असलेल्या भीषण हल्यामुळे युक्रेन सध्या होरपळत आहे. मात्र, याच देशाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या देशाला जगातील सर्वात मोठा सरोगसी हब म्हणून ओळखले जाते. मात्र, युद्धामुळे युक्रेनमधील सरोगेशी इंडस्ट्री प्रभावित झाली आहे.
सरोगेट बेबीसाठी अमेरिकेपासून ते ऑस्ट्रेलियापर्यंतची असंख्य दाम्पत्ये युक्रेनला धाव घेतात. मात्र, युद्धामुळे ही प्रक्रिया आता पूर्णपणे ठप्प झाली आहे.

रशियाने हल्ला केल्यापासून युक्रेनमधील सर्वसामान्य लोकांची सुरक्षा हा एक मोठा मुद्दा बनला आहे. या लोकांमध्ये लाखो सरोगेट मदर्सही आहेत. युद्धजन्य स्थितीत या सरोगेट मदर्सना सुरक्षेची खास आवश्यकता आहे. युक्रेनमधील सर्वात मोठी सरोगेट प्रोव्हायडर कंपनी बायोटेक्सकॉमने सांगितले की, या संकटकाळात सरोगेट मदर्सच्या सुरक्षेसाठी अनेक सेफ्टी बंकर्स तयार करण्यात आले आहेत. सध्या अशा बंकर्समध्ये 200 हून अधिक सरोगेट मदर्स आश्रय घेऊ शकतात.

उपलब्ध आकडेवारीनुसार युक्रेनमध्ये दरवर्षी दोन ते अडीच हजारांहून अधिक सरोगट बेबींचा जन्म होतो. अन्य देशांच्या तुलनेत युक्रेनमध्ये सरोगसी फारच स्वस्त आहे. 30 ते 50 हजार डॉलर्समध्ये सरोगसीची प्रक्रिया पूर्ण होते. तसेच अमेरिकेत ही प्रक्रिया सर्वात महागडी आहे. मात्र, युद्धामुळे यावर सध्या परिणाम होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news