वॉशिंग्टन : अंतराळाच्या या अनंत पसार्यात केवळ पृथ्वीवरच जीवसृष्टी असेल असे कुणालाही वाटणार नाही. कोणत्या ना कोणत्या ग्रहावर साध्या जीवाणूंच्या स्वरूपात का होईना जीवांचे अस्तित्व असेल, असेच अनेकांना वाटते. त्यामुळेच पृथ्वीबाहेर इतर ग्रहांवर सातत्याने अशा 'एलियन'चा शोध घेतला जात असतो. आता एका बाह्यग्रहाकडे याबाबत संशोधकांचे लक्ष गेले आहे. पृथ्वीसारखाच निळसर दिसणारा, पण पृथ्वीपेक्षा सुमारे नऊपट मोठा असलेल्या 'के2-18 बी' या एक्सोप्लॅनेटवर जीवसृष्टी असल्याचे संकेत मिळत आहेत.
नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपने 'के2-18बी' हा एक्सोप्लॅनेट शोधला आहे. हा बाह्यग्रह पृथ्वीपेक्षा 8.6 पट मोठा आहे. यापूर्वीच्या संशोधनात या एक्सोप्लॅनेटच्या वातावरणात मिथेन वायू आणि कार्बन डायऑक्साईडशी संबंधित रेणूही सापडले होते. या ग्रहावर मोठ्या प्रमाणात हायड्रोजन असल्याने याला 'हायसेन प्लॅनेट' असेही म्हंटले जाते. हा एक्सोप्लॅनेट पृथ्वीपासून 120 प्रकाशवर्षे दूर आहे. त्याचा आकार जवळजवळ नेपच्यूनएवढा आहे. हा ग्रह सौरमालेतील इतर ग्रहांपेक्षा वेगळा आहे.
संशोधनदरम्यान या एक्सोप्लॅनेटवर विशिष्ट प्रकारचे वायू सापडले आहेत. डायमिथाईल सल्फाइड वायू असे याचे नाव आहे. हे वायू सागरी जीव तसेच विशिष्ट प्राण्यांच्या अस्तित्वामुळे निर्माण होतात. नवीन संशोधनात या एक्सोप्लॅनेटवर डायमिथाईल सल्फाईड वायूचे अस्तित्व दिसून आले आहे. या पूर्वीच्या संशोधनात खगोलशास्त्रज्ञांना या ग्रहावर मिथेन, अमोनियासह इतर वायू आणि रसायने सापडली आहेत, परंतु ही रसायने तुलनेने कमी प्रमाणात आहेत. मात्र, हे वायू जैविक प्रक्रियेच्या कार्यात कितपत उपयुक्त ठरतील हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, येथे मोठ्या प्रमाणात हायड्रोजन आहे. या ग्रहावर पाण्याचे महासागर आहेत.
यामुळे येथे जीवसृष्टी अस्तित्वात असू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावर अधिक संशोधन सुरू आहे. या ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात असल्यास येथे मानवी वस्ती विकसित करता येऊ शकते. या ग्रहावर पाणी असल्याचे पुरावे समोर आले आहेत. त्यामुळे या ग्रहावर सृष्टी असल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. सूर्यमालेच्या बाहेरचा ग्रह आहे. या ग्रहावर पृथ्वीएवढंच तापमान असल्यामुळे हे सजीवसृष्टीला पोषक असल्याची माहिती अवकाश विज्ञानाचा अभ्यास करणार्या फ्रान्समधल्या संस्थेनं म्हटलंय. सूर्यमालेच्या पलिकडल्या ग्रहावर पाणी आढळल्याची ही पहिलीच घटना आहे. पृथ्वीसारखाच 'के2-18 बी'वर खडकाळ भाग आढळल्याचंही फ्रान्सच्या अवकाश शास्त्रज्ञांचं म्हणणे आहे.