‘या’ पदार्थांमुळे वाढतो कर्करोग, हृदयविकाराचा धोका

‘या’ पदार्थांमुळे वाढतो कर्करोग, हृदयविकाराचा धोका

लंडन : तुम्ही जंकफूडचे चाहते असाल, तर तुम्ही वेळीच सावध होणे गरजेचे आहे. एका अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार, काही प्रकारच्या जंकफूडच्या सेवनाने हृदयविकार आणि कर्करोग यासारखे गंभीर आजार होण्याचा धोका अनेक पटींनी वाढत आहे. ब्रिटनमधील 1,97,000 हून अधिक लोकांवर केलेल्या अभ्यासानुसार, अतिप्रक्रिया केलेले अन्न किंवा जंकफूडचे सेवन केल्याने कर्करोगासारख्या प्राणघातक आजारांचा धोका वाढू शकतो.

संशोधकांच्या मते, या अभ्यासात अर्ध्याहून अधिक महिलांना गर्भाशयाचा कर्करोग होता. जर तुम्ही जंकफूडचे अधिक सेवन करत असाल, तर तुम्हीही सतर्क राहायला हवे. या पदार्थांमुळे मधुमेह आणि लठ्ठपणा तर वाढतोच; पण कर्करोगचा धोकाही वाढतो. हे पदार्थ कर्करोगासाठी कारणीभूत कसे ठरतात ते जाणून घेऊया. ई-क्लिनिकल मेडिसीन या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने 34 वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगांमध्ये संबंध दिसून आला.

या अभ्यासासाठी संशोधकांनी 1,97,426 लोकांच्या खाण्याच्या सवयींची माहिती तपासली. इम्पीरियल कॉलेज लंडनने जारी केलेल्या अहवालानुसार, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाचा धोका दोन टक्क्यांनी वाढतो. अल्ट्रा प्रोसेस्ड फूडच्या अतिसेवनामुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. अभ्यासानुसार, जे लोक या जंकफूडचे जास्त सेवन करतात त्यांना गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका 30 टक्के जास्त असतो.

संशोधकांच्या मते, प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्याने कोणत्याही कर्करोगाचा धोका 2 टक्के आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका 19 टक्के वाढू शकतो. इम्पीरियल येथील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड केअर रिसर्च फेलो, लेखिका डॉ. कियारा चँग यांनी सांगितले की, हे पदार्थ दीर्घकाळासाठी साठवून ठेवण्यासाठी आणि त्यांची चव वाढवण्यासाठी यामध्ये रंग, चव, सुसंगतता आणि पोत वाढवणार्‍या पदार्थांचा वापर केला जातो. जे आरोग्यासाठी हानिकारक असतात आणि त्यांच्या सेवनाने अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news