‘या’ डायनासोरला होते अतिशय छोटे हात!

‘या’ डायनासोरला होते अतिशय छोटे हात!

वॉशिंग्टन : टी-रेक्ससारख्या डायनासोरची चित्रे पाहिल्यावर आपल्याला दिसते की, या डायनासोरचे पुढचे दोन पाय किंवा 'हात' हे अतिशय छोटे होते. मात्र, आता डायनासोरच्या अशा प्रजातीचे जीवाश्म मिळाले आहे, ज्यामध्ये हातासारखे दिसणारे हे दोन पुढचे पाय भलत्याच छोट्या आकाराचे होते. त्यांच्या शरीराच्या आकाराच्या तुलनेत हे हात अतिशय लहान होते. मात्र, हे डायनासोरही उत्तम शिकारी होते.

हे डायनासोर 16 फूट म्हणजेच 5 मीटर लांबीचे होते. त्यांना 'कोलेकेन इनाकायली' असे नाव देण्यात आले आहे. सध्याच्या अर्जेंटिनाच्या भूमीवर हे डायनासोर कोट्यवधी वर्षांपूर्वी वावरत होते. संशोधकांनी के. इनाकायली डायनासोरचे जीवाश्म मध्य पॅटागोनियाच्या ला कोलोनिया फॉर्मेशनमध्ये शोधले. याबाबतच्या संशोधनाची माहिती 'क्लॅडिस्टिक्स' या नियतकालिकात देण्यात आली आहे.

हे डायनासोर 'अ‍ॅबेलिसॉरीडी' कुळातील होते. 145 दशलक्ष ते 66 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या क्रेटाशिअस काळात ते गोंडवाना या महाखंडाच्या दक्षिण भागात मोठ्या संख्येने होते. हाँगकाँगच्या 'द चायनीज युनिव्हर्सिटी'मधील मायकल पिटमॅन यांनी सांगितले की, हे डायनासोर अतिशय कुशल शिकारी होते. प्राचीन काळातील उत्तर अमेरिकेत जी भूमिका टी. रेक्स डायनासोरची होती, तशीच या डायनासोरची अर्जेंटिनाच्या भागात होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news