

कॅलिफोनिया : समुद्रातील एक महत्त्वाचा जलचर म्हणून जेलिफिशला ओळखले जाते. या सागरी जीवाच्या शरीराची संरचना अत्यंत जटिल आणि किचकट असते. यामुळेच जेलिफिश म्हणजे संशोधकांसाठी मोठे गूढ ठरले होते. त्यांनी या जीवाला पारदर्शी जीवांच्या यादीत ठेवले.
मात्र, अलीकडच्या काही संशोधनातून स्पष्ट झाले की, या जीवाला ना मेंदू, ना हृदय आणि ना शरीरात हाडे असतात. खरे तर जेलिफिशचे शरीर अत्यंत पारदर्शी असते. याशिवाय अन्य जीवांच्या तुलनेत जे अवयव असावयास हवे असतात, तेच नसतात. जेलिफिशला जिवंत राहण्यासाठी कमी ऑक्सिजनची गरज भासते. याशिवाय हा जीव कोणत्याची प्रकारच्या पाण्यात राहू शकतो. उल्लेखनीय म्हणजे जेलिफिशची प्रजनन क्षमता जबरदस्त असते. यामुळेच हा जीव आपल्या पिल्लांना मोठ्या प्रमाणात जन्म देत असतो.
उल्लेखनीय म्हणजे 'नासा'ने प्रयोगासाठी सुमारे 2478 जेलिफिशना अंतराळात नेले होते, तेथे प्रयोगाच्या शेवटी असे आढळले की, जेलिफिशची संख्या अडीच हजारांवरून 60 हजारांवर पोहोचली.
दरम्यान, जेलिफिशच्या शरीरात सुमारे 98 टक्के पाणी असते. तर माणसाच्या शरीरात 60 टक्के पाणी असते. या जीवाला निसर्गाचे भरभरून वरदान मिळाल्याचे म्हटले जाते. कारण कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेत तो जिवंत राहतो. 2005 जेलिफिशचे 505 दशलक्ष वर्षांचे जीवाश्म सापडले होती. म्हणजे डायनासोरपेक्षाही प्राचीन, यामध्ये एकही हाड नव्हते हे विशेष. संशोधकांच्या मते, हा एक सागरी कीटक असला तरी त्याला माशाचा दर्जा देण्यात आला आहे.