माकड बनण्याचे ट्रेनिंग!

माकड बनण्याचे ट्रेनिंग!
Published on
Updated on

बार्सिलोना : पृथ्वीतलावर अब्जावधी प्रकारचे जीव आहेत. यापैकी एक म्हणजे माकड. हा जीव चपळ व चलाख बुद्धीसाठी प्रसिद्ध आहे. असेही म्हटले जाते की, माकड हे मानवाचे पूर्वज आहेत. यामुळेच असेल कदाचित; पण बार्सिलोनामध्ये सध्या लोक फी भरून माकड बनण्याचे ट्रेनिंग घेत आहेत.

कोणत्याही झाडावर चढून एक फांदीवरून दुसर्‍या फांदीवर लिलया चढण्यात माकडे तरबेज असतात. तसे पाहिल्यास माणूसही झाडावर चढू शकतो, मात्र त्याच्यात माकडाइतका वेग आणि अचूकता नसते. हाच वेग व अचूकता माणसात बिंबविण्यासाठी बार्सिलोनातील टारझन म्हणून ओळखला जाणारी व्यक्ती माकडाचे ट्रेनिंग देण्याचा क्लास चालवत आहे. यामध्ये माकडासारखे उड्या मारणे, झाडावर चढणे, उतरणे व लटकणे याचा समावेश आहे.

बार्सिलोनातील स्पॅनिश सिटी पार्कमध्ये लोकांना माकडे बनण्याचा ट्रेनिंग देणार्‍या व्यक्तीचे नाव विक्टर मॅन्यूअल फ्लेईटस् असे आहे. त्याने आपल्या क्लासचे नाव 'टारझन मुव्हमेंट' असे ठेवले आहे. लोकांना ट्रेनिंग देण्यासाठी विक्टरने खास झाडांची निवड केली आहे. जेणेकरून अगदी सोप्या पद्धतीने लोकांना माकडासारखे झाडावर चढणे, लटकणे, उतरणे अशा कला शिकविल्या जातील. यासाठी तो 10 यूरो इतकी फीसुद्धा घेतो. या क्लासला आता चांगला प्रतिसादही मिळू लागला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news