मध्ययुगातील सोन्याच्या नेकलेसचा शोध

मध्ययुगातील सोन्याच्या नेकलेसचा शोध
Published on
Updated on

लंडन : इंग्लंडमध्ये मध्ययुगातील एका सुंदर अशा नेकलेसचा शोध लावला आहे. हा नेकलेस रोमन नाणी आणि सेमीप्रेशियस रत्नांनी बनवलेला आहे. मानवी चेहरे असलेले एक पेंडंटही यामध्ये आहे. एका संपन्न घराण्यातील व धार्मिक स्त्रीच्या थडग्यात हा नेकलेस होता. ती कदाचित राजघराण्याशी संबंधित स्त्रीही असू शकते, असे संशोधकांना वाटते.

इंग्लंडच्या नॉर्थम्प्टनशायर येथे एका घरासाठी पाया खोदला जात असताना हा नेकलेस सापडला. हा नेकलेस इसवी सन 630 ते 670 या काळातील आहे, असे पुरातत्त्व संशोधकांनी म्हटले आहे. तो स्वच्छ करून त्याची म्युझियम ऑफ लंडन आर्कियोलॉजीतील तज्ज्ञांनी पुनर्रचना केली. तो पूर्वी कसे दिसत असेल याचे एक कल्पनाचित्रही तयार करण्यात आले. काही कमी मौल्यवान अशा खड्यांनी हा नेकलेस सजवलेला आहे. त्याचे पेंडंट सोन्याचे असून त्यामध्ये क्रॉसची रचना आहे. हे मोठे व आयताकृती पेंडंट आधी अन्य कारणासाठी बनवले गेले असावे व नंतर त्याचा वापर या हारात करण्यात आला असावा असे संशोधकांना वाटते. त्यामध्ये चांदीमध्ये कोरलेली मानवी चेहरे आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news