मगरीच्या पूर्वजाचे मिळाले जीवाश्म

मगरीच्या पूर्वजाचे मिळाले जीवाश्म

लंडन : जीवाश्म वैज्ञानिकांना मगरीच्या एका पूर्वजाचे जीवाश्म सापडले आहे. टेलर अँड फ्रान्सिसकडून प्रकाशित एका शोधनिबंधानुसार जीवाश्म वैज्ञानिकांनी 'थालाटोसुचियन' नावाच्या मगरीच्या पूर्वजाचे जीवाश्म शोधले आहे. या प्रजातीचे हे आतापर्यंत सापडलेले सर्वात जुने जीवाश्म आहे. इंग्लंडमध्ये जुरासिक तटाजवळ या 'टर्नरसुचय हिंगलेय' असे शास्त्रीय नाव असलेल्या प्राण्याच्या मणक्याचे हाड, कवटीचा काही भाग आणि अन्य अवयवांचे अवशेष मिळाले आहेत.

या प्राण्याचे हे नवे जीवाश्म म्हणजे आतापर्यंत आढळलेले या प्रजातीमधील एकमेव जवळजवळ संपूर्णावस्थेतील जीवाश्म आहे. प्रारंभिक ज्युरासिक प्लिन्सबॅचियन काळातील म्हणजेच सुमारे 18.5 कोटी वर्षांपूर्वी हा प्राणी अस्तित्वात होता. याबाबतच्या संशोधनाची माहिती 'जर्नल ऑफ व्हर्टेब्रेट पॅलियोंटोलॉजी'मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. या जीवाश्माच्या शोधामुळे जीवाश्म रेकॉर्डमधील काळाचे अंतर भरण्यास मदत होऊ शकते.

थालाटोसुचियन आणि अन्य मगरीसारख्या प्राण्यांसारख्या 'टर्नरसुचस'मध्ये दीड कोटी वर्षांचे अंतर आहे. संशोधक एरिक विल्बर्ग यांनी सांगितले की अशा प्रकारचे अन्यही काही जुने जीवाश्म मिळण्याची आशा आहे. या प्रजातींबाबतचे संशोधन आम्ही सुरूच ठेवणार आहोत. हे थालाटोसुचियन पहिल्यांदा ट्रायसिक काळात दिसून आले. ट्रायसिक काळाच्या अखेरीस ते लुप्त होण्यापासून बचावले. मात्र, एका विशिष्ट काळातील त्यांचे एकही जीवाश्म अद्याप सापडलेले नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news