फ्रिजमुळे तो 11 दिवस महासागरात राहिला जिवंत

फ्रिजमुळे तो 11 दिवस महासागरात राहिला जिवंत
Published on
Updated on

रिओ द जनरिओ : जीवनात अशा काही अचानक घटना घडतात की, त्याची आपल्याला पुसटशी कल्पनाही नसते. मात्र, कधी कधी याचे परिणाम अत्यंत गंभीर असतात. याचीच प्रचिती ब्राझीलमधील एका व्यक्‍तीला आली.

सुमारे 44 वर्षे वय आणि व्यवसायाने मच्छीमार असलेली रोमुआल्डो नामक व्यक्‍ती ब्राझीलच्या ओईपाक शहरातून मासे पकडण्यासाठी अटलांटिक महासागरात उतरली होती. मात्र, समुद्रात त्याची नाव बुडाली. अशा कठीण आणि प्राणावर बेतलेल्या गंभीर प्रसंगात त्याला नावेतील न बुडालेल्या फ्रिजची साथ मिळाली. या फ्रिजमध्ये बसून त्याने महासागरात तब्बल 11 दिवस काढले.

महासागरात ज्या ठिकाणी त्याची नाव बुडाली होती, त्या ठिकाणाहून तब्बल 450 कि.मी. अंतरावरील दुसर्‍या देशातील लोकांनी रोमुआल्डोला वाचविले.

11 दिवस काहीच न खाता राहिल्याने रोमुआल्डोचे वजन पाच किलोने कमी झाले होते. 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीप्रमाणे त्याला सुरीनाम देशाच्या सीमेत वाचवण्यात आले. मात्र, इतके दिवस तो अत्यंत धोकादायक शार्क माशांच्या भागात होता. यामुळे हे महाकाय मासे आपल्याला निश्‍चितपणे भक्ष्य बनवतील, अशी भीती रोमुआल्डोला सतत वाटत होती.

रोमुआल्डोला 11 ऑगस्टला वाचवण्यात आले; पण कोणतीही कागदपत्रे नसताना व विनापरवाना सीमेत प्रवेश केल्याने त्याला सुरीनामच्या तुरुंगात डांबण्यात आले. 16 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर तो नुकताच मायदेशी परतला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news