पृथ्वीच्या पोटातील सोने संपण्याच्या मार्गावर?

पृथ्वीच्या पोटातील सोने संपण्याच्या मार्गावर?
Published on
Updated on

वॉशिंग्टन : सोन्याला आपण 'राजधातू' म्हणत असतो. प्लॅटिनमसारखे धातू सोन्यापेक्षाही अधिक मौल्यवान असले तरी सोन्याची झळाळी तसेच लोकप्रियताही अशा धातूंना नाही. जगभरातील अनेक देशांत सोन्याचे उत्खनन होते. या सोन्यामुळे त्या त्या देशांची अर्थव्यवस्था चालत असते. मात्र, या देशांसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. जगभरातील सोने आता संपत चाललंय. येत्या 20 वर्षांत पृथ्वीच्या पोटातील सोने संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक देशांसाठी ही चिंताजनक बाब आहे. तज्ज्ञांनी देखील यावर चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आता पृथ्वीवर किती टक्के सोने उरलंय? आणि आता सोन्याचा शोध कुठे घेता येईल? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँक गोल्डमन सॅक्सला भीती आहे की, येत्या 20 वर्षांत जमिनीखालील सोने पूर्णपणे संपणार आहे. कारण जगभरात खूप वेगाने उत्खनन होत आहेत, त्यामुळे पृथ्वीवरचे सोने संपत चालले आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत सोने पूर्णपणे संपण्याची भीती आहे. यूएस जिऑलॉजिकल सर्व्हेनुसार, आतापर्यंत सुमारे 2 लाख टन सोने काढले गेले आहे. आता पृथ्वीवर फक्त 50 हजार टनच सोने शिल्लक आहे. जर पृथ्वीखाली 50 हजार टन सोने उरले असेल तर ते दोन मालवाहू जहाजांमध्ये येऊ शकेल इतकेच आहे. विशेष म्हणजे पृथ्वीवर किती टक्के सोने शिल्लक आहे, याबाबत वेगवेगळ्या संस्था वेगवेगळी आकडेवारी देतात, त्यात थोडाफार फरक असतो.

अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँकर जिम रिचर्डस् त्यांच्या 'द न्यू केस फॉर गोल्ड' या पुस्तकात सांगतात की, सोने संपणार आहे, याबाबत अनेक भाकिते करण्यात आली आहे. मात्र, तरीही खाणकाम चालूच राहील. यासाठी नवीन तंत्रे येतील. पृथ्वीवर जरी सोने संपले तरी अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथून सोने उत्खनन केले जाऊ शकते. जसे समुद्राच्या खाली, बर्फाळ वाळवंटात शोध घेतला जाऊ शकतो. या प्रश्नावर खगोल भौतिक शास्त्रज्ञ डॉ. नील डीग्रास टायसन यांनी सुचवले की अंतराळात असलेल्या लघुग्रहांमध्ये सोन्याचा साठा असू शकतो. हे खरे असेल तर ही जगासाठी मोठी आशा असू शकते. एका लघुग्रहाचे नाव '16-सायक' आहे, जो सोने, प्लॅटिनम, निकेल आणि लोहापासून बनलेला आहे. सुमारे 225 किलोमीटर व्यासाच्या या तुकड्यात इतके सोने आहे, ज्याची निश्चित गणनाही करता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news