पृथ्वीचा गाभा कठीण नाही?

पृथ्वीचा गाभा कठीण नाही?

वॉशिंग्टन : पृथ्वीचा 'इनर कोअर' किंवा आतील गाभा हा घनरूप आणि कठीण असल्याचे मानले जाते. मात्र, आता एका नव्या संशोधनानुसार तो थोडासा मऊ असल्याचेही दिसून आले आहे. पृथ्वीच्या पोटातील रहस्ये अद्याप दडलेलीच असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे!

गेल्या अर्धशतकापासून विज्ञानात असे मानले जात आहे की पृथ्वीचा इनर कोअर हा लोखंडाचा एक तप्त आणि घनरूप असा मजबूत गोळा आहे. त्याभोवती द्रवरूप आऊटर कोअर म्हणजेच बाह्य गाभा आहे. आता याबाबत एक नवे संशोधन झाले असून त्याची माहिती 'फिजिक्स ऑफ द अर्थ अँड प्लॅनेटरी इंटेरिअर्स' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

त्यामध्ये म्हटले आहे की पृथ्वीचा इनर कोअर हा मऊ आणि द्रवरूपही होत गेलेला आहे. इंग्लंडमधील ब्रिस्टॉल युनिव्हर्सिटीच्या जेसिका आयर्विंग यांनी म्हटले आहे की हा केवळ लोखंडाचा 'बोअरिंग ब्लॉब' नाही असे दिसून आले आहे.

एका अर्थी अद्यापही हा इनर कोअर 1864 मध्ये ज्युलिस व्हर्ने यांनी लिहिलेल्या 'जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ' या कथेप्रमाणे आजही रहस्यमयच आहे. या लेखकाने पृथ्वी आतून पोकळ असल्याचे म्हटले होते. अर्थात ती तशी नाही हे संशोधकांनी 1950 च्या दशकातच स्पष्ट केले होते. मात्र, तरीही आपल्या ग्रहाचे अंतरंग पूर्णपणे उलगडू शकलेले नाही असेच म्हणावे लागेल!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news