पुढील दहा वर्षांमध्ये मंगळावर जाणार माणूस!

पुढील दहा वर्षांमध्ये मंगळावर जाणार माणूस!

वॉशिंग्टन : पृथ्वीच्या शेजारच्या मंगळ ग्रहाकडे नेहमीच खगोलशास्त्रज्ञांचे लक्ष लागून राहिलेले आहे. मंगळ पृथ्वीप्रमाणेच ठोस, खडकाळ पृष्ठभूमीचा असून एके काळी या ग्रहावर योग्य वातावरण आणि वाहते पाणीही होते. सध्या मंगळावर 'नासा'चे अनेक रोव्हर आहेत. भविष्यात माणसाला मंगळावर पाठवण्याची स्वप्ने अनेक देशांचे संशोधक पाहात आहेत. स्पेस एक्स कंपनीचे सीईओ अ‍ॅलन मस्क यांनी तर अनेक वर्षांपूर्वी मंगळावर मानवी वसाहत बनवण्याची घोषणा केली होती. आताही त्यांनी एक मोठा दावा केला आहे. एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, पुढील तीस वर्षांच्या काळात माणूस मंगळावर आपली नवी वसाहत स्थापन करेल. येत्या दहा वर्षांमध्येच माणूस मंगळावर जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'लेस दॅन फाईव्ह इअर्स फॉर अनक्रूड'. याचा अर्थ पाच वर्षांमध्येच मानवरहित यान मंगळावर जाईल. 'लेस दॅन टेन टू लँड पीपल' (दहा वर्षांच्या आतच माणूस मंगळावर उतरेल). मे बी अ सिटी इन ट्वेंटी इअर्स (वीस वर्षांमध्येच मंगळावर एखादे शहर बनेल), बट फॉर श्युअर इन 30, सिव्हीलायझेशन सेक्युअर्ड (तीस वर्षांमध्ये माणूस नक्कीच मंगळावर आपली वसाहत स्थापन करील व मानवी संस्कृती टिकून राहिल.) एलन मस्क यांनी मंगळाला पुन्हा एकदा हिरवेगार करण्याची योजना आखली आहे. त्यांच्या या टि्वटनुसार येत्या पाच वर्षांमध्ये मंगळावर एखादी मानवरहित मोहीम लाँच केली जाऊ शकते). अ‍ॅलन मस्क मंगळ मोहिमेसाठी खास यान व रॉकेटही बनवत आहेत. हे रॉकेट जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट असेल. मस्क यांचे 'एक्स'वर 18.3 कोटी फॉलोअर्स आहेत. एका व्यक्तीने ट्विट करून म्हटले आहे की, अनेक लोकांसाठी हे अकल्पनीय आहे… आशा आहे की, प्रगती पाहण्यासाठी मी आणखी दहा वर्षे जिवंत राहीन!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news