दक्षिण कोरियात लोकसंख्या वाढवण्यासाठी कोट्यवधींचा खर्च

दक्षिण कोरियात लोकसंख्या वाढवण्यासाठी कोट्यवधींचा खर्च
Published on
Updated on

सेऊल : दक्षिण कोरियातील जन्मदर अतिशय कमी आहे. देशात वृद्धांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यांच्या देखभालीसाठी सुविधांमध्ये बदल करण्यात येत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये याठिकाणी चाईल्ड केअर सेंटरच्या सुविधांमध्ये घट दिसून आली आणि दुसरीकडे वृद्ध लोकांच्या सुविधा वाढवण्यात आल्याचे पाहायला मिळते. तेथील जन्मदरात 2015 पासून सातत्याने घट होत आहे. गेल्या सोळा वर्षांमध्ये सरकारने लोकसंख्या वाढीसाठी सुमारे 16.4 लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक खर्च केला आहे!

सरकारी आकडेवारीनुसार 2017 मध्ये दक्षिण कोरियात 40 हजारांपेक्षाही अधिक चाईल्ड केअर सेंटर होते, जे गेल्या वर्षीच्या अखेरपर्यंत 30,900 पर्यंत घसरले. 2017 मध्ये वृद्धांसाठीच्या केअर सेंटरची संख्या 76 हजार होती जी 2022 पर्यंत 89,643 पर्यंत पोहोचली. या संस्थांमध्ये ज्येष्ठ व्यक्तींसाठीचे देखभाल गृह, विशेष रुग्णालय आणि वेलफेयर एजन्सींचा समावेश आहे. दक्षिण कोरियात जगातील वेगाने वाढत असणारी वृद्धांची संख्या आहे. शिवाय येथील 65 पेक्षा अधिक वयाच्या 40 टक्क्यांहून अधिक लोकांना गरिबीचाही सामना करावा लागत आहे. त्यांचे उत्पन्न सरासरी घरगुती खर्चापेक्षा 50 टक्के कमी आहे. त्यामुळे भविष्यातही त्यांच्यासाठीच्या संस्थांमध्ये वाढ होऊ शकते. दुसरीकडे मुलांची संख्या कमी असल्याने देशभरातील अनेक प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा बंद पडल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news