तुतानखामेनचा सोन्याचा खंजीर ‘परग्रहावरचा’?

तुतानखामेनचा सोन्याचा खंजीर ‘परग्रहावरचा’?
Published on
Updated on

कैरो : इजिप्तमध्ये तरुण वयातच मृत्यूमुखी पडलेल्या तुतानखामेन या राजाचे अत्यंत वैभवशाली थडगे सापडल्यापासून हा राजा सातत्याने चर्चेत असतो. सोन्या-चांदीच्या बहुमोल वस्तूंनी भरलेले त्याचे थडगे व त्याची सोन्याने मढवलेल्या शवपेटीतील ममी अनेक दशकांपासून चर्चेचा विषय आहे. या राजाविषयी सातत्याने नवे नवे संशोधनही होत असते. आता त्याच्या थडग्यात सापडलेला सोन्याचा खंजीरही चर्चेत आला आहे. एका पुरातत्त्व संशोधकाने या खंजिराबाबत भन्नाट दावा केला आहे. हा खंजीर तुतानखामेनला 'दुसर्‍या दुनियेतून' भेट म्हणून मिळालेला होता, असा या संशोधकाचा दावा आहे! अर्थात हा खंजीर परग्रहावरून आलेल्या उल्केपासून बनवलेला आहे.

या खंजिरामध्ये सोन्याबरोबरच अशा काही धातूंचे अंश सापडले आहेत जे पृथ्वीवर सापडत नाहीत. त्यामुळे या संशोधकाने असा दावा केला आहे व त्यावर संशोधकांमध्येच दुफळी माजली आहे. तुतानखामेनच्या या खंजिराबाबत दोन संशोधन प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत. हा खंजीर तुतानखामेनच्या आधीच्या एखाद्या प्राचीन फेरो म्हणजेच राजाने बनवला होता का याबाबतची उलटसुलट मतेही व्यक्त केली जात आहेत. पहिल्या संशोधनात म्हटले आहे की या खंजिराची निर्मिती उल्कांपासून घेतलेल्या धातूने झाली आहे. त्याचा शोध अ‍ॅनातोलियामध्ये म्हणजे सध्याच्या तुर्कीमध्ये लागला होता.

दुसर्‍या संशोधनात म्हटले आहे की या खंजिराची निर्मिती कशी झाले हे एक रहस्यच आहे. त्यावर निश्चित असे काही सांगणे अतिशय कठीण आहे. तुतानखामेनने इजिप्तवर इसवी सन पूर्व 1333 ते इसवी सन पूर्व 1323 या काळात राज्य केले होते. तो वयाच्या 19 व्या वर्षीच मृत्यूमुखी पडला. त्याला अ‍ॅनिमियाची म्हणजेच रक्ताच्या कमतरतेची समस्या होती असे म्हटले जाते. त्याच्या मृत्यूबाबतही अनेक दावे केले जात असतात. 1922 मध्ये या फेरोच्या थडग्याचा शोध लावण्यात आला होता. तिथे अनेक मौल्यवान वस्तूही सापडल्याने जगभर हे थडगे चर्चेचा विषय बनले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news