तब्बल 32 हजार बर्गर खाणारा माणूस!

तब्बल 32 हजार बर्गर खाणारा माणूस!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : बर्गर, पिझ्झा, नूडल्स वगैरे पदार्थ आपल्याकडे अधूनमधून केवळ रूचीपालट म्हणून खाल्ले जात असतात. मात्र, पाश्चात्त्य देशांमध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण यामध्ये हेच खाणारी माणसं आहेत व त्यामुळेच ते लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार वगैरेंना आयते आवतण देतात. एका माणसाने तर कहरच केला आहे. त्याने तब्बल 32 हजार बर्गर फस्त करून याबाबतचा एक विश्वविक्रमच केला आहे. त्याच्या नावाची नोंद गिनिज बुकमध्येही झालेली आहे.

या माणसाचे नाव डॉन गोर्स्के. अमेरिकेत राहणार्‍या या माणसाने 17 मे 1972 मध्ये पहिल्यांदा बर्गर खाल्ला होता. त्यावेळेपासून त्याने चटक लागल्यासारखे रोज बर्गर खाण्यास सुरुवात केली. 1999 मध्ये 5,490 बर्गर खाऊन 'सर्वाधिक बर्गर खाणारी व्यक्ती' म्हणून त्याने पहिला विक्रम केला. आता 50 वर्षांमध्ये या माणसाने 32,340 बर्गर खाल्ले आहेत. या माणसाचा हा विक्रम ऑगस्ट 2021 पर्यंतच्या गणतीच्या आधारावर नोंदवण्यात आला आहे. डॉनच्या आयुष्यात या काळात क्वचितच असे दिवस आले असतील ज्या दिवशी त्याने बर्गर खाल्ले नाही. गेल्या 50 वर्षांमध्ये केवळ आठ दिवस असे होते ज्यावेळी आपण बर्गर खाल्ले नाहीत असे तो सांगतो. मात्र, आपण दिवसातून जास्तीत जास्त दोन बर्गर खातो असेही या माणसाने म्हटले आहे. डॉनला बर्गर इतके आवडतात की त्यांनी त्याचे रॅपरही जमा करून ठेवले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news