ड्रॅगन फ्रूटमध्ये अनेक आरोग्यदायी गुण

ड्रॅगन फ्रूटमध्ये अनेक आरोग्यदायी गुण
Published on
Updated on

नवी दिल्ली : 'ड्रॅगन फ्रूट'च्या नावात 'ड्रॅगन' असला तरी मुळात हे फळ अमेरिकन भूमीवरील कॅक्टसच्या एका प्रकारातील वनस्पतीवर येणारे फळ आहे. आपल्याकडे त्याला 'कमलम' असे म्हटले जात आहे. हे सुंदर फळ चवीला गोड असते आणि आरोग्यासाठीही गुणकारी असते. या फळामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतात.

ड्रॅगन फ्रूटमध्ये नैसर्गिकरीत्या अँटिऑक्सिडंटस् भरपूर असतात. यासोबतच त्यात फ्लेव्होनॉइड, एस्कॉर्बिक अ‍ॅसिड आणि भरपूर फायबर आढळतात. हे सर्व पोषक घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात तसेच वाढलेली साखर पातळी कमी करतात. अधिक कोलेस्टेरॉलच्या समस्येमध्ये आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये टाकाऊ पदार्थ जमा होऊ लागतात ज्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात. त्यामुळे रक्तप्रवाहावर वाईट परिणाम होतो आणि हृदयासारख्या अत्यावश्यक अवयवापर्यंत योग्यप्रकारे पोहोचू न शकल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड आणि एलडीएलसी म्हणजेच लिपोप्रोटिनमुळे कोलेस्ट्रॉल कमी होते, असे या अभ्यासातून समोर आले आहे. असे घटक ड्रॅगन फू्रटमध्ये असतात. ड्रॅगन फू्रट हाडे मजबूत करण्यास मदत करते. तसेच ड्रॅगन फू्रटमध्ये असलेले मॅग्नेशियम दात मजबूत करते.

ड्रॅगन फू्रट गरोदरपणात फायदेशीर आहे. लोहयुक्त ड्रॅगन फळ रक्त वाढवते. ड्रॅगन फू्रटमुळे मानसिक आरोग्य झपाट्याने सुधारते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news