टेडी बीयर जमवण्याचा ’तिचा’ विक्रमी छंद

टेडी बीयर जमवण्याचा ’तिचा’ विक्रमी छंद
Published on
Updated on

वॉशिंग्टन : जगाच्या पाठीवर अनेक लोकांनी अनेक प्रकारचे विक्रम केलेले आहेत. विविध वस्तू गोळा करून त्यांचा मोठा संग्रह करण्याचाही अनेकांना छंद असतो व त्यामधूनही विश्वविक्रम घडत असतात. अमेरिकेतील एका महिलेला खेळण्यातील टेडी बीयरने असेच वेड लावले आहे. तिने जगभरातून हरेक नमुन्याचे टेडी बीयर गोळा केले आहेत. तिच्या संग्रहात तब्बल 8,026 टेडी बीयर असून, याबाबत तिच्या नावाची नोंद गिनिज बुकमध्येही झाली आहे.

अमेरिकेच्या साऊथ डकोटा येथे राहणार्‍या या महिलेचे नाव आहे जॅकी मायली. 68 वर्षांच्या या आजीबाईंनी सहा वर्षांपूर्वी सर्वाधिक टेडी बीयर गोळा करण्याचा विश्वविक्रम केलेला आहे. हे सर्व टेडी बीयर तिने तब्बल 30 देशांमधून गोळा केले आहेत. तिला हे 'क्यूट' टेडी इतके आवडतात की, जिथे दिसतील तेथून ती त्यांना खरेदी करून आपल्याजवळ ठेवते. हा छंद त्यांना सन 2000 मध्ये जडला. त्यावेळी त्यांना एका सहलीवेळी स्पर्धेत टेडी बीयर बक्षीस म्हणून मिळाला होता. त्यांनी या टेडीचे नाव 'ग्रँडमा जॅकी' असे ठेवले. त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी फिरून वेगवेगळे टेडी बीयर खरेदी केले. त्यांच्या संग्रहातील सर्वात छोटा टेडी तीन चतुर्थांश इंचाचा असून, सर्वात मोठा टेडी आठ फुटांचा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news