टिपलेले सावज आकाशात!

टिपलेले सावज आकाशात!

कॅलिफोर्निया : जंगलातले, धक्कादायक व्हिडीओ अनेकदा व्हायरल होत असतात. अनेक शक्तिशाली प्राणी कमकुवत प्राण्यांची शिकार करतात आणि त्यापूर्वी कमकुवत प्राणी स्वतःला वाचवण्यासाठी धडपडताना दिसत असतात. आता हरणाची शिकार करून गरुड आकाशात उडताना यापूर्वी तर कधीच पाहण्यात आले नसेल, पण सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून त्यात हरणाची शिकार केल्यानंतर गरुड आकाशात उडताना दिसत आहे. हे द़ृश्य पाहून नेटिझन्सनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

हा व्हिडीओ एक्स या पूर्वाश्रमीच्या टि्वटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला शेअर केल्यापासून 19.5 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले आहे – हरणाच्या शरीरासह संकरित गरुड दिसत आहे. आणखी एका युजरने लिहिले आहे – कदाचित गरुड माझ्या विचारापेक्षा मोठा असेल, असा तर तो आपल्याला उचलून सुद्धा उडू शकेल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये गरुड हरणाची फक्त शिकार करत नाही, तर त्याला पकडल्यानंतर आकाशात उडतानाही दिसत आहे. व्हिडीओमध्ये आजूबाजूला फक्त पर्वत दिसत आहेत. असे म्हटले जाते की, गोल्डन ईगल्स अनेकदा पर्वतांमध्ये आढळतात आणि ते खूप शक्तिशाली असतात, जे त्यांचे शिकारीचे काम अतिशय हुशारीने पूर्ण करू शकतात आणि व्हिडीओतील गरुड त्यापैकीच एक असू शकतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news