ज्वालामुखींच्या स्फोटाने पृथ्वीवर टिकून राहिला ऑक्सिजन

ज्वालामुखींच्या स्फोटाने पृथ्वीवर टिकून राहिला ऑक्सिजन

वॉशिंग्टन : पृथ्वीवरील जीवनासाठी 'ऑक्सिजन' हा वायू सर्वात जास्त महत्त्वाचा आणि गरजेचा आहे. ऑक्सिजनशिवाय कोणताही जीव जिवंत राहू शकणार नाही तसेच पाणीही असणार नाही. असेही म्हटले जाते की, ऑक्सिजनच्या निर्मितीच्या प्रक्रियेस सुमारे 2400 कोटी वर्षांपूर्वी सुरुवात झाली.

मात्र, इतके दिवस हा वायू कसा टिकून राहिला? असा प्रश्‍न उपस्थित होतो. यासंदर्भात करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनात अनेक आश्‍चर्य वाटणारे खुलासे करण्यात आले आहेत.

पृथ्वीच्या वातावरणात ऑक्सिजन टिकून राहण्याचे प्रमुख कारण म्हणजे 'ज्वालामुखी'. ज्वालामुखींमधून सातत्याने होणार्‍या स्फोटांमुळेच पृथ्वीवरील ऑक्सिजन टिकून आहे. स्फोटांमुळेच ऑक्सिजन पृथ्वीच्या संपूर्ण वातावरणात पसरण्यास मदत झाली. ऑक्सिजनची निर्मिती होणे आणि टिकून राहण्यासंबंधी अनेक सिद्धांत आहेत.

यासंदर्भात आजतागायत अनेक प्रयोग करण्यात आले आणि अनेक पुरावेही सादर करण्यात आले. यासंदर्भात करण्यात आलेल्या एका संशोधनात पृथ्वीच्या संथ गतीमुळेच वातावरणात ऑक्सिजन टिकून राहिला आहे.

मात्र, नव्या संशोधनातील निष्कर्षानुुसार ज्वालामुखीय स्फोटांमुळे पृथ्वीच्या वातावरणात ऑक्सिजन टिकून आहे व आतापर्यंत बनत आले आहे. ऑक्सिजनच्या निर्मिती प्रक्रियेस 2400 कोटी वर्षांपूर्वी सुरुवात झाली. ऑक्सिजन बनण्यासंबंधीच्या मोठ्या घटनेच्या 5 ते 10 कोटी वर्षांपूर्वीही पृथ्वीवर ऑक्सिजन होता; पण तो अल्पकाळासाठीच अस्तित्वात होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news