जगातील स्वादिष्ट सफरचंद

जगातील स्वादिष्ट सफरचंद

सिमला : सफरचंदाची गोड, मधूर चव हवीहवीशी वाटणे साहजिकच. या सफरचंदांच्या अनेक जाती काश्मीर आणि हिमाचलमध्ये आढळतात. देश-विदेशातही येथील सफरचंदांना मोठी मागणी असते. गोल्डन डेलिशीयस, ब्रेबर्न, मोंगेंडी, लोनास गोल्ड, ग्लोस्टर, जोनाथन, फुजी, पिंक लेडी, रेड डेलिशीयस, ग्रॅनी, गोल्डन सुप्रीम, पिंक लेडी या जातीची सफरचंदं परदेशात बरेच लोकप्रिय आहेत.

काही सफरचंदं तर त्यापेक्षाही खूप खास असतात. हनीक्रिस्प सफरचंद उत्तर अमेरिकेत, विशेषतः मिनेसोटा आणि विस्कॉन्सिन भागात घेतले जाते. त्याची खासियत म्हणजे ती कुरकुरीत, रसाळ आणि गोड असतात. ग्रॅनी स्मिथ सफरचंद जगभरात बर्‍याच ठिकाणी येते. मोठा आकार, हिरवा रंग आणि जाड साल ही त्याची खास वैशिष्ट्ये.

याशिवाय, फुजी अ‍ॅपल जपानमध्ये आढळते. पण आता ते जगभर घेतले जाते. पिवळ्या-हिरव्या रंगांचे दिसणारे हे सफरचंद गोड, कुरकुरीत आणि रसाळ आहे. रेड फुजी आणि सन डेलिशीयस भारतातील उत्तराखंडमध्ये घेतले जाते. गाला अ‍ॅपल प्रामुख्याने न्यूझीलंड, उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये घेतले जाते. त्याची चव गोड, मलईदार आणि कुरकुरीत असते. त्याची त्वचा गडद लाल रंगाची असते. चायनीज रेड डेलिशीयस हे खूप खास आहे. त्याचा रंग काळ्या द्राक्षासारखा असल्यामुळे त्याला ब्लॅक डायमंड अ‍ॅपल म्हणतात. तिबेटच्या डोंगराळ भागात याची लागवड केली जाते. या जातीला 'हुआ निऊ' म्हणतात. एका ब्लॅक डायमंड सफरचंदाची किंमत डझनला 6 हजार रुपयांच्या आसपास असू शकते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news