

वॉशिंग्टन : जगात सोन्यापेक्षाही महागड्या वस्तू आणि धातू आहेत. त्यापैकी 'एंटिमेटर' हे एक आहे. एक ग्रॅम एंटिमेटरची किंमत 6.25 लाख कोटी डॉलर अर्थात 393.75 लाख कोटी रुपये आहे.
एंटिमेटर हे एका पदार्थासारखेच आहे. एंटिमेटरचा वापर अंतराळ यान आणि विमानांमध्ये इंधन म्हणून केला जातो. एंटिमेटरकडे विध्वंसक स्फोटक म्हणूनही पाहिले जाते. अर्धा किलो एंटिमेटरमध्ये एक हायड्रोजन बॉम्बपेक्षा जास्त शक्तिशाली असते. परंतु, एंटिमेटरमधील उपयोगी ऊर्जा प्राप्त करण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. 'नासा'च्या माहितीनुसार, एक मिलीग्रॅम एंटिमेटर बनवण्यासाठी 250 लाख रुपये खर्च येतो. संशोधन कार्यात एक मिलीग्रॅम एंटिमेटर पुरेसे असते.
एंटिमेटरचा शोध विसाव्या शतकात लागला. अंतराळात छोट्या-छोट्या कणांमध्ये एंटिमेटर सापडते. पदार्थामध्ये ज्याप्रमाणे प्रोटोन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन आढळतात, अगदी त्याचप्रमाणे एंटिमेटरमध्ये एंटिप्रोटोन, पोसिट्रॉन्स आणि एंटिन्यूट्रॉन आढळतात. एंटिमेटर बनवण्यासाठी लॅबमध्ये संशोधक इतर पदार्थांचा वापर केला जातो. अंतराळयान आणि अण्वस्त्रासाठी याचा वापर केला जातो.
रॉकेट लाँचरमध्ये देखील एंटिमेटरचा वापर होतो. एक ग्रॅम एंटिमेटरची विक्री करून जगातील 100 छोटे देश खरेदी केले जाऊ शकतात. एक ग्रॅम एंटिमेटरची किंमत 393.75 लाख कोटी रुपये आहे. 'नासा'नुसार, एंटिमेटर हे पृथ्वीवरील सर्वात महागडा धातू आहे. 'नासा'मध्ये एंटिमेटर ठेवलेल्या ठिकाणी मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. काही ठराविक लोकांशिवाय एंटिमेटरपर्यंत कोणीच पोहोचू शकत नाही.