जगातील सर्वात बुटक्या व्यक्तीला टि्वटरचा उजाळा!

जगातील सर्वात बुटक्या व्यक्तीला टि्वटरचा उजाळा!
Published on
Updated on

तेहरान : काही दिवसांपूर्वी जगातील सर्वात लांब व्यक्तीची बरीच चर्चा रंगली होती. तुर्कीच्या सुलतान कोशनकडे हा मान जातो. त्याची उंची तब्बल 8 फूट 3 इंच इतकी आहे. गिनिज बुकमध्ये त्याचे नावही नोंद आहे. जगातील सर्वात बुटकी व्यक्तीही आता चर्चेत आली असून टि्वटरने याला उजाळा दिला आहे.

जगातील सर्वात कमी उंचीची व्यक्ती म्हणून इराणच्या अफशीन इस्माईल गदरजादेहची नोंद आहे. आश्चर्य वाटेल, पण, त्याची उंची एखाद्या टरबुजाइतकीच आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने टि्वटरवर अफशीनची नव्याने माहिती दिली असून 20 वर्षीय अफशीनची उंची जेमतेम 2 फूट 1.68 इंच इतकी असल्याचे नमूद केले आहे. त्याची उंची इतकी कमी आहे की, ती मोजताना देखील दोनवेळा खातरजमा करून घ्यावी लागते, असे टि्वटरमध्ये यावेळी म्हटले गेले आहे.

अफशीनने कोलंबियाच्या 36 वर्षीय एडवर्ड नीनो हर्नांडेझचा विक्रम मागे टाकत आपले नाव गिनीजमध्ये नोंदवले होते. एडवर्डची उंची 2 फूट 4.38 इंच इतकी मोजली गेली होती.

सध्या विक्रम खात्यावर असलेल्या अफशीनचा जन्म इराणमधील पश्चिम प्रांत अझरबैजाननजीक एका गावात झाला. जन्मावेळी साधारणपणे वजन 2 किलोपेक्षा कमी असत नाही. पण, आश्चर्य म्हणजे अफशीनचे जन्मावेळचे वजन 700 ग्रॅम इतकेच होते. गिनिज बुकने दिलेल्या माहितीनुसार, कमी उंचीमुळे त्याचे आयुष्य बरेच कष्टप्रद रहात आले आहे. तो खेळापासून अभ्यासापर्यंत प्रत्येक क्षेत्रात इतर मुलांच्या तुलनेत मागे राहिला. नंतर तो इतका घाबरला की, त्याने शाळेला जाणेही सोडून दिले. कुटुंबातील गरीबीमुळे त्याचे औषधोपचारही होत नव्हते. पण, गिनिज बुकने दखल घेतली आणि त्याचे आयुष्यच बदलून गेले.

आता अफशीनला कित्येक ठिकाणी मानाने बोलावले जाते आणि त्याचे तितकेच आदरातिथ्यही केले जाते. काहीच दिवसांपूर्वी अफशीन दुबईतील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफालाही गेला होता. अर्थात, तो आता एकटा कुठेही फिरत नाही. आपल्या पालकांना घेऊनच तो बाहेर जातो. कारण, तो जिथे जातो, तिथे त्याच्याभोवती लोकांचा गराडा पडतो, हे नेहमीचेच झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news