कंडक्टरने चपळाईने वाचवले प्रवाशाला!

कंडक्टरने चपळाईने वाचवले प्रवाशाला!

तिरुवनंतपुरमः कधी कधी अतिशय अनपेक्षितरीत्या एखाद्याचा जीव वाचत असतो. त्यासाठी काही माणसंच कारणीभूत होत असतात. कमालीचे प्रसंगावधान आणि चपळ हालचाली यासाठी कारणीभूत ठरतात. अशीच एक घटना केरळमध्ये घडली असून, त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ केरळमधील एका बसमधील आहे. बसमधून तोल जाऊन पडणार्‍या तरुणाचे प्राण या कंडक्टरने थक्क करणार्‍या चपळ हालचालीने वाचवले आहेत. ही घटना इतकी आश्चर्यकारक आहे, जी पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, एक बस सुसाट वेगाने रस्त्यावरून धावत आहे. कंडक्टर दरवाजाजवळील सीटला टेकून उभा आहे आणि दरवाजासमोर उभ्या असलेल्या प्रवाशांचे तिकीट काढत आहे. तो तिकीट काढत असताना अचानक ड्रायव्हरने ब—ेक दाबल्याने दरवाज्यात उभ्या असलेल्या तरुणाचा तोल जातो आणि तो बसमधून खाली पडणार असतो; पण बस कंडक्टर पटकन त्याचा हात धरून ओढून घेतो. तरुणाला कंडक्टरने वेळीच हात दिल्यामुळे तो बसच्या बाहेर पडत नाही.

कंडक्टरच्या मदतीने तो पुन्हा बसमध्ये नीट उभा राहतो. कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे तरुणाचा जीव वाचतो; पण हे सर्व इतक्या पटकन घडते की नक्की काय घडले कोणालाही समजत नाही. व्हिडीओमध्ये कंडक्टरकडे पाहिले, तर तो नेहमीप्रमाणे काम करत आहे आणि तरुणाला अत्यंत सहजपणे हात देतो. तरुणाला हात देताना कंडक्टर साधे मागे वळूनही बघत नाही, जणू त्याला माहीत होते, की आता तो पडणार आहे. हे द़ृश्य एखाद्या चित्रपटातील (विशेषतः रजनीकांतच्या!) असल्यासारखे वाटते. कंडक्टरने हस्तक्षेप केला नसता, तर बसच्या चाकाखाली प्रवासी तरुण चिरडला गेला असता. 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या व्हिडीओला 3,07,000 व्ह्यूज मिळाले आहेत. पोस्टबरोबर ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, "केरळच्या 25 व्या इंद्रिय असलेल्या बस कंडक्टरने एका व्यक्तीला बसमधून पडण्यापासून वाचवले." अनेक लोक या कंडक्टरची चपळाई पाहून त्याला 'स्पायडरमॅन' म्हणत आहेत!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news