ओप्पीला नोव्हा नावाच्या किड्याचे प्रजनन जोडीदाराशिवायच

ओप्पीला नोव्हा नावाच्या किड्याचे प्रजनन जोडीदाराशिवायच
Published on
Updated on

बर्लिन : 'ओप्पीला नोव्हा' नावाच्या किड्यामधील मादी जोडीदाराशिवायच प्रजनन करून पिल्‍लांना जन्म देते. हे जीव अतिशय दीर्घकाळ म्हणजेच हजारो-लाखो वर्षेही जिवंत राहू शकतात. ते अलैंगिक पद्धतीनेही प्रजनन करू शकतात. त्यामुळे दीर्घकाळ नराशी कोणताही संबंध न येताही माद्या पिल्‍लांना जन्म देऊ शकते.

अलैंगिक प्रजननात नर-मादी मिलनाची गरज राहत नाही. जोडीदाराशिवायच असे जीव प्रजोत्पादन करू शकतात. त्यामधून जी अपत्ये निर्माण होतात ती नर किंवा मादीचे क्लोन असल्याप्रमाणेच असतात.

काही प्राण्यांशिवाय जीवाणू, आर्किया, कवकही अशा प्रकारचे अलैंगिक प्रजनन करतात. प्रत्यक्ष नर-मादी संबंधाशिवायच एखादी प्रजाती लाखो वर्षे टिकून राहिली आहे हे एक आश्‍वर्यच आहे.

'ओप्पीला नोव्हा' ही प्रजाती अशाच पद्धतीने लाखो वर्षे जिवंत राहिली आहे. त्यांचा आकार अतिशय सूक्ष्म असतो. एक मिलीमीटरच्या पाचव्या हिश्श्याइतक्या आकाराचे ते असतात. कोलोन आणि गॉटिंगेन विद्यापीठाच्या संशोधकांनी त्यांच्यावर संशोधन केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news