ऑरोरा बरोबर आवाजही येतो ऐकू?

ऑरोरा बरोबर आवाजही येतो ऐकू?
Published on
Updated on

लंडन : ध्रुवीय प्रदेशांमध्ये 'ऑरोरा' किंवा 'नॉर्दन लाईटस्' हा विविधरंगी प्रकाशाचा खेळ आकाशात रंगत असतो. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला सौरकण धडकले की असा प्रकाश निर्माण होतो. मात्र, या प्रकाशाबरोबरच ध्वनीही निर्माण होतो असे म्हटले जाते. अनेक संशोधक या सिद्धांताशी असहमत आहेत. मात्र, 2016 मध्ये फिनलँड मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात ऑरोराबरोबर माणसाला ऐकू येईल असा आवाजही येतो असे आढळले होते.

एका संशोधकाने या आवाजाचे रेकॉर्डिंगही केले आहे. त्यामध्ये हा आवाज स्वच्छ ऐकू येतो. मात्र, हा ध्वनी कसा निर्माण होतो हे समजलेले नाही. 'द कन्झर्व्हेशन'नुसार संशोधिका फियोना एमरी यांनी या आवाजाचा छडा लावण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्या म्हणण्यानुसार विसाव्या शतकात याबाबत बरीच चर्चा होत होती. त्याठिकाणी राहत असलेले लोक प्रकाशाबरोबरच आवाज ऐकू येत असल्याचा दावा करीत होते. काही लोक हा विचित्र आवाज असल्याचेही सांगत. विशेषतः ज्यावेळी प्रकाश अधिक तीव्र आणि सक्रिय असे त्यावेळी असे आवाज ऐकू येत.

दोन लाकडे एकमेकांना घासल्यासारखा हा आवाज असल्याचे काहींचे म्हणणे होते. कॅनडा आणि नॉर्वेमधूनही असे दावे केले जात होते. जो प्रकाश कमी उंचीवर असतो तेथून असे आवाज येण्याची शक्यता अधिक वर्तवली जात असे. खरे तर 1932-33 च्या काळात ऑरोरा बहुतांशी पृथ्वीपासून शंभर किलोमीटरवर होते आणि क्वचितच ते 80 किलोमीटरपर्यंत निर्माण झाले.

अशा वेळी प्रकाशातून आवाज ट्रान्समिट होणे व तो ऐकू येणे हे अशक्य असल्याचे अनेक संशोधकांचे म्हणणे होते. काहींना हा लोकांचा भम असल्याचे वाटत होते. मात्र, प्रसिद्ध संशोधक कार्ल स्टॉर्मर यांनी आपल्या दोन सहायकांच्या हवाल्याने असे आवाज ऐकले गेल्याचा दावा केला. त्यानंतर या दाव्यांना गांभीर्याने घेण्यात येऊ लागले.

त्यांचे सहायक हॅन्स यांच्या म्हणण्यानुसार हा आवाज शिटीसारखा होता व तो ऑरोराबरोबरच सुरू होता. दुसरे सहायक जॉन यांच्या म्हणण्यानुसार हा आवाज जळणार्‍या गवताची तडतड किंवा स्प्रेसारखाही होता. मात्र, हा आवाज कसा निर्माण होतो हे समजू शकले नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news