ऊर्जेची नासाडी रोखणारा सॅटेलाईट

ऊर्जेची नासाडी रोखणारा सॅटेलाईट

लंडन : आपल्या घराची खिडकी किंवा दार उघडे राहिले असेल तर त्याचा छडा चक्क अंतराळातूनही लावता येऊ शकतो. हे शक्य होईल घरांमधून निघणार्‍या ऊर्जेच्या अचूक आकलनाने. ब्रिटिश सरकारने एक हिट सेन्सिंग सॅटेलाईट तयार केले असून ते लाँच करण्याची सध्या तयारी सुरू आहे. हे सॅटेलाईट अशाप्रकारे प्रोग्रॅम केले जात आहे जेणेकरून हाय डेफिनेशन इन्फ्रारेड रेडिएशन डिटेक्टरपासून ऊर्जा उत्सर्जनाचे अचूक आकलन केले जाईल.

स्पेस कंपनी 'सॅटेलाईट वीयू'चे सीईओ अँथोनी बेकर यांनी सांगितले की त्यांच्या या सॅटेलाईटमध्ये युनिक इन्फ्रारेड कॅमेरा लावण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीने कोणत्याही घरातून बाहेर पडणार्‍या ऊर्जेच्या उत्सर्जनाची अचूक गणना केली जाऊ शकते. ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजेच कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईडसारख्या प्रदूषणकारी वायूंच्या उत्सर्जनावर पूर्णपणे लगाम लावणे हे सर्वात कठीण काम आहे.

आपल्या घरांमधून, कार्यालयांमधून तसेच कारखान्यांमधून जर ऊर्जेचे उत्सर्जन मोठ्या वेगाने होत असेल तर ते कठीणच ठरणार आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार आपण या सॅटेलाईटच्या सहाय्याने आपली कंपनी, सरकारी उपक्रमांतर्गत येणारे विजेचे बिलही कमी करू शकतो. कंपनीकडून हा सॅटेलाईट गिल्डफोर्ड शहरात सात थर्मल इमेजिंग तपासण्यांनंतर बनवला जात आहे. जागतिक तापमानवाढी विरोधातील लढ्यात तो सहायक ठरू शकतो. पुढील वर्षी हा कृत्रिम उपग्रह एलन मस्क यांची कंपनी 'स्पेस एक्स'च्या 'फाल्कन-9' रॉकेटच्या सहाय्याने अंतराळात सोडला जाईल. या प्रकल्पासाठी बि—टिश स्पेस एजन्सी 200 कोटी रुपयांपेक्षाही अधिक खर्च करीत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news