इलेक्ट्रॉनिक नाक लावणार कोलोन कॅन्सरसारख्या आजारांचा छडा

इलेक्ट्रॉनिक नाक लावणार कोलोन कॅन्सरसारख्या आजारांचा छडा

लंडन : आजारांचे वेळीच निदान झाले की वेळेत योग्य उपचार करता येतात व रुग्ण लवकर बरा होण्यास मदत मिळते. त्यासाठी आता वैज्ञानिक अनेक प्रकारची उपकरणे विकसित करीत आहेत. त्यामध्येच 'इलेक्ट्रॉनिक नोज'चा समावेश आहे. या इलेक्ट्रॉनिक नाक याच्या सहाय्याने यकृत, फुफ्फुस आणि कोलोन कॅन्सरसारख्या आजारांचा छडा लावता येऊ शकतो.

यासाठी हे नाक आपल्या नाकावर एखाद्या मास्कसारखे लावावे लागते. त्यानंतर काही वेळातच आजाराचा छडा लागतो. ब्रिटनमधील बायोटेक कंपनी 'आउलस्टोन मेडिकल'ने हे इलेक्ट्रॉनिक नोज विकसित केले आहे.

या ई-नोजच्या मदतीने कोव्हिड-19 चेही निदान करता यावे यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. सर्वसाधारणपणे रुग्ण चाचणीसाठी रक्त किंवा मूत्राचे नमुने देत असताना संकोच करतात किंवा घाबरतात. आता ही नवी पद्धत सर्वच लोकांसाठी सहजसोपी ठरू शकते. हे ई-नोज रुग्णाच्या श्वासातून येणार्‍या विशिष्ट गंधाचा वापर करून रोगाचा छडा लावते.

वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की ज्यावेळी माणूस श्वास सोडतो त्यावेळी त्यामध्ये 3500 पेक्षाही अधिक व्होलाटाईल ऑर्गेनिक कम्पाऊंडस् असतात. त्यामध्ये वायूचे अतिशय सूक्ष्म कण आणि मायक्रोस्कोपिक ड्रॉपलेटस् असतात. हे ई-नोज अशा व्होलाटाईल ऑर्गेनिक कम्पाऊंडस्मधील रसायनांची तपासणी करते आणि आजाराचा छडा लावते. वैज्ञानिकांना अशा प्रकारचे उपकरण बनवण्याची संकल्पना खरे तर 1970 मध्येच सूचली होती.

मात्र, या संकल्पनेला सेन्सेटिव्ह डिव्हाईसमध्ये रूपांतरीत करण्यात तसेच व्होलाटाईल ऑर्गेनिक कम्पाऊंडस्ला ओळखण्यासाठीचे प्रोग्रॅमिंग आणि सेन्सर तयार करण्यास अनेक दशकांचा कालावधी लागला. जगभरातील अनेक देशांमध्ये आता या उपकरणाची चाचणी सुरू आहे. विशेषतः ब्रिटनमध्ये चाचण्यांचे सकारात्मक परिणाम मिळत आहेत. पुढील पाच वर्षांच्या काळात ही ई-नोज चाचणी सर्वत्र रुळेल असे वैज्ञानिकांना वाटते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news