‘इथे’ प्राणी असतात मुक्त आणि माणूस पिंजर्‍यात!

‘इथे’ प्राणी असतात मुक्त आणि माणूस पिंजर्‍यात!
Published on
Updated on

बीजिंग : अनेक प्राणीसंग्रहालयात वन्यप्राण्यांना पिंजर्‍यात ठेवले जाते आणि माणूस फिरत फिरत त्यांना पाहत जात असतो. मात्र, चीनमधील एक प्राणीसंग्रहालय विशेष आहे. तिथे एका बंदिस्त जागेत वन्य प्राण्यांना मोकळे सोडलेले असते व त्यांना पाहण्यासाठी पर्यटक पिंजर्‍यासारख्या वाहनातून येतात!

चोंगक्विंग सिटीमध्ये असलेल्या या प्राणीसंग्रहालयाचे नाव 'लेहे लेदू वाईल्डलाईफ झू' असे आहे. हे प्राणीसंग्रहालय तब्बल 33 हेक्टर जागेत फैलावलेले असून तिथे वाघ, सिंह, अस्वल, लांडगे आणि हरणासारखे दोनशेहून अधिक वन्यप्राणी आहेत. याठिकाणी लोकांना हे प्राणी अगदी जवळून पाहायला मिळतात, अर्थातच पिंजर्‍यात बसून! त्यासाठी अतिशय महागडे तिकीट खरेदी करावे लागते. पिंजर्‍यासारख्या मोठ्या वाहनातून पर्यटकांना या प्राण्यांजवळून फिरवले जाते. हे वाघ-सिंह पिंजर्‍यावरही पंजे टेकवून उभे राहतात. इथे प्राण्यांची नीट काळजीही घेतली जाते. सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमधून त्यांच्यावर चोवीस तास नजर ठेवली जाते. कोणत्याही इमर्जन्सीमध्ये पाच मिनिटांतच मदत पोहोचते. पर्यटकांनाही याठिकाणी जाण्यापूर्वी विविध सूचना देण्यात येतात. पिंजर्‍याबाहेर शरीराचा कोणताही भाग काढू नये ही सक्त सूचना त्यामध्ये असते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news