इक्वाडोरमध्ये बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध

इक्वाडोरमध्ये बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध
Published on
Updated on

क्वीटो : वैज्ञानिकांनी इक्वाडोरमध्ये 'स्ट्रीम फ्रॉग' या बेडकांची नवी प्रजाती शोधली आहे. हा बेडूक हलक्या गुलाबी डोळ्यांचा आहे. त्याच्या पायाच्या बोटांवर केळासारखे दिसणारे पिवळे डाग आहेत. त्याला पाहताच संशोधकांना 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' चित्रपटाची आठवण झाली. त्यामुळे त्यांनी त्याला 'द हॉबिट' असे संबोधले आणि त्याला 'द लॉर्ड ऑफ द रिंग्ज' पुस्तकाचे लेखक जे.आर.आर. टोल्किन यांच्यावरून 'हायलोसिर्टस् टोल्किनी' असे शास्त्रीय नाव दिले.

इक्वाडोरमधील राष्ट्रीय जैव विविधता संस्थेचे सहयोगी संशोधक दियागो एफ. यांनी सांगितले की या बेडकाच्या शरीरावरील रंगसंगती अनोखी आहे. त्याला पाहिले की असे वाटते, तो काल्पनिक विश्वातीलच प्राणी आहे. अशीच कल्पना टोल्किन यांनीही केली होती. हा बेडूक 2.6 इंच लांबीचा आहे. त्याचा 'बेस कलर' करडा आहे आणि त्यावर काळे ठिपके आहेत. त्याचा गळा, पोट आणि पंजे सोनेरी पिवळ्या रंगाचे आहेत. त्याचे गुलाबी रंगाचे डोळेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

रियो नीग्रो-सोपलाडोरा नॅशनल पार्कमध्ये त्याचा शोध घेण्यात आला. हे पार्क 1,85,000 एकरमध्ये फैलावलेले आहे. स्ट्रीम बेडकांच्या अन्य प्रजातींप्रमाणेच हा बेडूकही उंच ठिकाणी असलेल्या पाण्यात राहतो. समुद्र सपाटीपासून 3100 मीटर उंचीवरील पॅरामो गवताच्या मैदानात हा बेडूक आढळून आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news