इंग्लंडमध्ये सापडले दुसर्‍या महायुद्धातील पॅराशूट!

इंग्लंडमध्ये सापडले दुसर्‍या महायुद्धातील पॅराशूट!
Published on
Updated on

लंडनः पुरातन काळात संवादासाठी लोक एकमेकांना पत्र लिहीत असत आणि ती पत्रे कबुतरांच्या मार्फत एकमेकांपर्यंत पोहोचवली जायची. बॉलिवूडपटांसह अनेक विदेशी चित्रपटातदेखील कबुतरांना अशी पत्रे घेऊन जात असताना दाखवले गेले आहे. या कबुतरांना छोटे पॅराशूट लावले जायचे. त्यात ती पत्रे बांधली जायची आणि त्यानंतर ते कबूतर सोडले जात असे. अलीकडेच, कबुतराचे असेच एक पॅराशूट एका महिलेच्या घरात जुन्या सामानात आढळून आले, त्यावेळी सर्वांसाठी तो आश्चर्याचा धक्का होता.

एलिंग्टन नामक दिवंगत महिलेच्या घरी हे अतिशय दुर्मीळ कबुतराचे पॅराशूट आढळून आले. मिळालेल्या माहितीनुसार, दुसर्‍या महायुद्धादरम्यान या पॅराशूटचा वापर केला गेला होता. आता त्याला जवळपास 80 वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर सदर पॅराशूट एलिंग्टन यांच्या घरात पडून असलेल्या शूजच्या एका डब्यात असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या कुटुंबीयांनी इंग्लंडमधील 'अ‍ॅक्सेस स्थित हाउस ऑन द हिल' या टॉय म्युझियमला सदर पॅराशूट सुपूर्द केले आहे.

एलिंग्टन यांच्या नातेवाइकाने दिलेल्या माहितीनुसार, प्रदीर्घ कालावधीनंतर घराची साफसफाई करताना शूज बॉक्स उघडण्यात आले आणि त्यात हे पॅराशूट ठेवले असल्याचे दिसून आले. या पॅराशूटसह आणखी काही दस्तऐवजदेखील मिळाले आहेत. या पॅराशूटचा उपयोग 6 जून 1944 रोजी लँडिंगपूर्वी केला गेला होता, असा अंदाज आहे. दुसर्‍या महायुद्धाच्या कालावधीत माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी कबुतरांवरच अधिक अवलंबून राहावे लागत होते.

आयएमए या संस्थेकडे असलेल्या माहितीप्रमाणे प्रत्येक कबुतराला विशिष्ट नाव किंवा क्रमांकाने ओळखले जायचे आणि पॅराशूटमधून अनेक प्रकारची माहिती पाठवली जायची. शत्रूंची हल्ल्याची रणनीती, त्यांची ताकद, त्यांच्याकडील रसद आदी सर्व माहितीचा त्यात समावेश होत असे. रेडिओ सिग्नल कमकुवत असल्यास अशा वेळी संदेश पाठवण्यात कबुतर पॅराशूटची विशेष मदत होत असे, असेही यात नमूद आहे. 'हाउस ऑन द हिल टॉय' म्युझियममध्ये काही पॅराशूटची मॉडेल्स समाविष्ट आहेत. त्यात या नव्या पॅराशूटची आता भर असणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news