असा करा शार्कचा सामना!

असा करा शार्कचा सामना!
Published on
Updated on

कॅलिफोर्निया : डिस्कव्हरी शार्कस् या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शार्कशी संबंधित रंजक माहिती, छायाचित्रे व व्हिडीओ अपलोड केले जातात. सध्याच एक नवा व्हिडीओ या अकाऊंटवर पोस्ट केला गेला असून यात एका खलाशाने अतिशय धोकादायक शार्कलादेखील कसा चकवा द्यावा, यावर मार्गदर्शन केले आहे.

वास्तविक, शार्क किती धोकादायक असतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. शार्कच्या हल्ल्यानंतर माणसाची अवस्था काय होऊ शकते, हे आपण अनेक व्हिडीओच्या माध्यमातून पाहिले आहे. जगभरातील अक्राळविक्राळ शार्कच्या हल्ल्यात कित्येक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. साहजिकच, असा शार्क समोर आला, तर त्यातून सुटका करवून घेता येईल का, हा यक्ष प्रश्नच ठरतो. पण, एका खलाशाने थेट शार्कसमोरच व्हिडीओ केला असून स्वत:चा कसा बचाव करता येईल, यावर मार्गदर्शन केले आहे. शार्क समोर आल्यानंतर पाय जोरात हलवत राहणे आणि पुढील बाजूने पोहत तेथून पोबारा करण्याचा प्रयत्न करणे हे पर्याय योग्य ठरत नाहीत. शार्क जसजसे आपण पायांची हालचाल करतो, पाण्यात खळबळ करतो, तोवर आपल्या दिशेने येत राहतो. शार्क आपल्या मागेच येत राहत असेल, तर तो आपल्याला शिकार समजत आहे, याचे ते लक्षण असते. अशा स्थितीत आपण आहे त्या जागेवर थांबून शार्कच्या दिशेने फिरावे. गरज पडल्यास, शक्य असल्यास आपले हात पूर्ण ताकदीने त्याच्या डोक्यावर ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे या व्हिडीओत म्हटले आहे.

या व्हिडीओला आतापर्यंत 16 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही उमटत राहिल्या आहेत. यातील काही प्रतिक्रियांमध्ये, तर अनेक युजरनी असे स्पष्टपणे म्हटले आहे की, जर शार्क समोर असेल, तर आपण यातील काही करण्याची गरजच नाही. जे काही करायचे ते तो शार्कच करेल!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news