अपघातानेच बनला होता पाव!

अपघातानेच बनला होता पाव!
Published on
Updated on

कैरो : जगातील अनेक गोष्टींचा शोध हा अपघातानेच लागलेला आहे. त्यामध्येच जगभरात 'स्टेपल फूड' बनलेल्या ब्रेडचा म्हणजेच पावाचा समावेश होतो. 'स्टेपल फूड' म्हणजे ज्या पदार्थाशिवाय आपले स्वयंपाकघर अपूर्ण राहते असा पदार्थ. आपल्याकडे तर पाव चहासोबतही खाल्ला जातो आणि वडा, भजी, मिसळसारख्या पदार्थांबरोबरही खाल्ला जातो. पावाचे सँडविचही केले जाते आणि पावाची फोडणी टाकून भाजीही बनवली जाते. असा हा बहुपयोगी पाव निव्वळ अपघातानेच सुरुवातीला बनला होता!

मध्य-पूर्वेला विशेषतः इजिप्तला पावाची जननी मानले जाते. असे मानले जाते की इसवी सनापूर्वी 4 हजार या काळात म्हणजेच सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी कुणी एक अज्ञात बेकर रोजच्यासारखी फ्लॅटब्रेड म्हणजेच रोटी बनवत होता. मात्र, तासाभरासाठी तो वेगळ्याच कामात गुंग झाला आणि ज्यावेळी त्याने त्या कणकेपासून रोटी बनवली त्यावेळी ती अधिकच फुगली. ते पाहून त्याला आश्चर्य वाटले.

या रोटीचा स्वाद आणि 'टेक्स्चर'ही वेगळेच होते. त्या तासाभराच्या काळात ही कणीक उघडी ठेवल्याने हवेतील वाईल्ड यीस्टमुळे कणकेत आंबवण्याची क्रिया झाली होती. या 'फर्मेंटेशन'मुळे रोटी फुगली आणि अधिक चवदार झाली. तेथूनच हळूहळू पावाची निर्मिती झाली. विसाव्या शतकात औद्योगिकरण झाल्यावर नॅचरल फर्मेंटेशनची जागा रसायनांनी घेतली. बाजारात रेडिमेड यीस्ट मिळू लागले. त्याबरोबरच पावाचे उत्पादनही वाढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news