

वॉशिंग्टन : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) जगात सध्या एका नव्या यशाची गाथा लिहिली जात आहे. सिलिकॉन व्हॅलीतील तीन 22 वर्षीय मित्रांनी असे काम केले आहे, ज्यामुळे संपूर्ण टेक इंडस्ट्री थक्क झाली आहे. यापैकी दोन भारतीय वंशाचे आहेत, आदर्श हिरेमठ आणि सूर्या मिधा, तर तिसरा आहे ब्रेंडन फूडी. मार्क झुकेरबर्गला मागे टाकून या भारतीय वंशाच्या तरुणांनी सर्वात कमी वयाचे अब्जाधीश बनण्याचा मान मिळवला आहे.
तिथे ते अनेकदा रात्री उशिरापर्यंत राष्ट्रीय वादविवाद स्पर्धांची तयारी करत असत. याच वादविवादांनी त्यांना तार्किक विचार आणि जलद विश्लेषण शिकवले, जे नंतर त्यांच्या व्यवसायाच्या यशाचा पाया ठरले.
आदर्श हिरेमठ : हार्वर्डमधून कॉम्प्युटर सायन्स, सूर्या मिधा : जॉर्जटाऊनमधून फॉरेन सर्व्हिस आणि ब्रेंडन फूडी : जॉर्जटाऊनमधून इकोनॉमिक्सचे शिक्षण घेतले आहे. कॉलेजमध्ये वेगळे असतानाही तिघांनी एआय आणि भविष्यातील कामाच्या पद्धतीवर चर्चा सुरू ठेवली. 2023 मध्ये कॉलेजच्या दुसर्या वर्षात असताना, या तिघांनी मिळून मेरकॉरची सुरुवात केली. सुरुवातीची कल्पना एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म जो भारतातील प्रतिभावान इंजिनिअर्सना अमेरिकेतील स्टार्टअप कंपन्यांशी जोडेल. पण लवकरच ही कल्पना बदलली आणि मेरकॉर एआय आधारित भरती प्लॅटफॉर्म बनला, जो जगभरातील व्यावसायिकांना एआय प्रोजेक्टस्शी जोडतो.
आज मेरकॉरवर 30,000 हून अधिक विशेषज्ञ नोंदणीकृत आहेत, ज्यात कायदा, वैद्यकशास्त्र, फायनान्स आणि अभियांत्रिकी यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. ओपन एआय, अँथ्रोपिक, गुगल डीप माईंड?आणि ‘मॅग्निफिसेंट सेव्हन’मधील सहा मोठ्या टेक कंपन्या मेरकॉरचे ग्राहक आहेत. मेरकॉरच्या वाढीचा वेग खरोखरच आश्चर्यकारक आहे. 2024 च्या मध्यापर्यंत कंपनीने 500 दशलक्ष डॉलर्स वार्षिक कमाईचा टप्पा पार केला, तर काही महिन्यांपूर्वी ती फक्त 100 दशलक्ष डॉलर्स होती. कंपनीचे सीटीओ आदर्श हिरेमठ सांगतात की त्यांचे स्वप्न आहे की, मेरकॉर असे प्लॅटफॉर्म बनावे, जिथे ‘प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कार्य (ढरीज्ञ) किंवा नोकरीशी जोडले जाईल.’