तब्बल 84 वर्षांनंतर सापडले बुडालेल्या जहाजाचे अवशेष

तब्बल 84 वर्षांनंतर सापडले बुडालेल्या जहाजाचे अवशेष
Published on
Updated on

लंडन : कधी कधी एखाद्या कोसळलेल्या विमानाचे किंवा बुडालेल्या जहाजाचे अवशेष सापडणे कठीण होऊन बसते. अनेक वर्षांनंतर असे अवशेष सापडल्याच्याही घटना घडल्या आहेत. आताही एका बुडालेल्या जहाजाचे तब्बल 84 वर्षांनंतर अवशेष सापडले आहेत. 'एसएस अर्लिंग्टन' नावाचे हे जहाज 1940 मध्ये बुडाले होते. अमेरिकेतील लेक सुुपिरियरमध्ये बुडालेल्या या जहाजाचे आता अवशेष सापडले आहेत.

हे जहाज वादळी हवामानात अडकून बुडाले होते. त्यावेळी एक विचित्र घटना घडली होती. जहाज बुडत असल्याचे पाहून जहाजातील सर्व कर्मचारी लाईफबोटीवर चढले; पण जहाजाचा कॅप्टन फ्रेडरिक बर्कने वेळ असूनही लाईफबोटीत चढण्यास नकार दिला. त्याने हसत हसत सर्वांना 'गुडबाय' केले आणि तेवढ्यात जहाज तलावात सामावून गेले. कॅप्टनने असे का केले, हे आजपर्यंत समजले नाही. विशेष म्हणजे इतिहासप्रसिद्ध 'टायटॅनिक' जहाज बुडत असतानाही त्याच्या कॅप्टनने लाईफबोटीतून स्वतःची सुटका करवून घेतली नव्हती! फ्रेडरिक बर्क यांचे जहाज का बुडाले, याचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही.

आता त्याच्या अवशेषांचे परीक्षण करून याबाबत काही माहिती मिळते का हे पाहिले जाईल. मिशिगनमधील नेगौनी येथील रहिवासी असलेल्या फौंटन नावाच्या माणसामुळे या जहाजाचा शोध लागला. तो जवळजवळ एक दशकापासून या जहाजाचा सुपिरियर लेकमध्ये रिमोट सेन्सिंगने शोध घेत होता. हे तळे साधारण तळ्यासारखे छोटेसे नाही. ते क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. आकारमानानुसार ते जगातील तिसरे मोठे सरोवर असून, जगातील दहा टक्के गोडे पाणी त्याच्यामध्ये आहे. अनेक शतकांपासून या तलावाचा व्यावसायिक शिपिंग कॉरिडॉर म्हणून वापर केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news