रोम : जगभरात अनेक भव्य इमारती असलेल्या आणि अत्यंत महागडी फी असलेल्याही शाळा आहेत. (World's Smallest School) मात्र, इटलीत एक शाळा अशी आहे जी 'सर्वात लहान' म्हणून ओळखली जाते. या शाळेत केवळ एकच विद्यार्थी आणि एक शिक्षिका आहे.
ही छोटी शाळा इटलीच्या तुरिनमध्ये आहे. (World's Smallest School) या शाळेत सोफिया विवोला नावाची एकच विद्यार्थिनी शिकते. तिला शिकवण्यासाठी शाळेत एक शिक्षिका आहेत. आठ वर्षांची सोफिया तिसरीत आहे. तिला 33 वर्षांच्या इसाबेल बाई शिकवतात. दोघींच्या या छोट्याशा शाळेचे नाव आहे 'अल्पेट'. सुंदर पर्वतराजीत, निसर्गरम्य वातावरणात ही शाळा आहे. शाळेतील अध्यापन पूर्ण झाले की ही विद्यार्थिनी आपल्या शिक्षिकेसमवेत या पर्वतराजीत फिरण्यासाठी जाते. क्रमिक पुस्तकातील धडे घेण्याबरोबरच ती शिक्षिकेबरोबर निसर्गाच्या सान्निध्यात राहून त्याच्याकडूनही नवे धडे घेत असते. अर्थातच तिला सहाध्यायींची, मित्र-मैत्रिणींची कमतरता जाणवते!