जगातील सर्वात महागडे नेल पॉलिश
वॉशिंग्टन : 'जगातील सर्वात महागडे नेल पॉलिश' अशी 'अॅझाचर'ची ओळख आहे. या नेल पॉलिशची किंमत तब्बल 2.5 लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे 2.05 कोटी रुपये आहे. इतक्या किमतीत चार महागड्या मोटारी खरेदी करता येऊ शकतात!
हे नेल पॉलिश अमेरिकेतील लॉस एंजिल्समधील एक डिझायनर 'अॅझाचर पोगोशियन'ने बनवले आहे. त्यांनी यापूर्वीही अनेक नेल पॉलिश तयार केले आहेत. मात्र, काळ्या रंगाचे चमकदार असे 'अॅझाचर' नेल पॉलिश हे जगातील सर्वात महागडे नेल पॉलिश ठरले. ते बनवण्यासाठी 267 कॅरेटच्या ब्लॅक डायमंडचा म्हणजेच काळ्या हिर्याचा वापर करण्यात आला. त्यामुळेच त्याची किंमत सुमारे दोन कोटी रुपये इतकी आहे. इतक्या किमतीत चार फॉर्च्युनर मोटारी खरेदी करता येतात. त्यांची किंमत सुमारे 50 लाख रुपये असते. हे नेल पॉलिश इतके महाग आहे की आतापर्यंत केवळ 25 ग्राहकांनीच ते खरेदी केलेले आहे.

