world largest gold mine | सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणीतून निघतेय दरवर्षी लाखो टन सोने

world largest gold mine  |
world largest gold mine | सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणीतून निघतेय दरवर्षी लाखो टन सोने
Published on
Updated on

नेवाडा (अमेरिका) : सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे जगभरात या मौल्यवान धातूची चर्चा असतानाच, जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणीने उत्पादनाचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. अमेरिकेतील नेवाडा राज्यात असलेली ‘नेवाडा गोल्ड माईन्स’ ही सध्या जगातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक उत्पादन देणारी सोन्याची खाण ठरली आहे.

नेवाडा गोल्ड माईन्स ही केवळ एक खाण नसून, तो अनेक मोठ्या खाणींचा एक विशाल समूह आहे. 2019 मध्ये ‘बॅरिक गोल्ड’ आणि ‘न्यूमोंट कॉर्पोरेशन’ या दोन दिग्गज कंपन्यांनी एकत्र येऊन हा प्रकल्प सुरू केला. यामध्ये कार्लीन, कोर्टेझ, टर्क्वाइज रिज आणि फिनिक्स यांसारख्या प्रसिद्ध खाणींचा समावेश आहे. या खाणीतून दरवर्षी होणारे उत्पादन पाहून कोणाचेही डोळे पांढरे होतील. या खाणीतून दरवर्षी सुमारे 30 ते 35 लाख औंस सोन्याचे उत्पादन होते. हा प्रकल्प इतका मोठा आहे की येथे हजारो कामगार 24 तास काम करत असतात. जमिनीच्या खोल भागातून सोने काढण्यासाठी येथे जगातील सर्वात प्रगत स्वयंचलित मशिनरी आणि रोबोटिक्सचा वापर केला जातो.

या खाणीशिवाय उझबेकिस्तानातील मुरुंटाऊ तसेच इंडोनेशियातील ग्रासबर्ग या सोन्याच्या खाणीही मोठ्या आहेत. उत्पादनाच्या बाबतीत अमेरिकेची खाण प्रथम क्रमांकावर असली, तरी आकारमानानुसार उझबेकिस्तानमधील ‘मुरुंटाऊ’ खाण ही जगातील सर्वात मोठी ‘ओपन पिट’ (उघडी) खाण मानली जाते. ही खाण 3.3 किलोमीटर लांब आणि 850 मीटर खोल आहे. रशिया आणि ऑस्ट्रेलियातील खाणी देखील या शर्यतीत मागे नाहीत. तज्ज्ञांच्या मते, पृथ्वीच्या पोटातील सोन्याचा मोठा साठा अजूनही शोधणे बाकी आहे. मात्र, ते काढण्यासाठी लागणारा खर्च सोन्याच्या किमतीपेक्षा जास्त असल्याने अनेक खाणी अजूनही बंद आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news