Deepest Cave in World | जॉर्जियात आहे जगातील सर्वात खोल गुहा..!

Deepest Cave in World |
Deepest Cave in World | जॉर्जियात आहे जगातील सर्वात खोल गुहा..!
Published on
Updated on

नवी दिल्‍ली : जगातील सर्वात खोल गुहेचा (डिपेस्‍ट केव्‍ह) बहुमान जॉर्जिया देशातील 'अराबिका मॅसिफ' या पर्वतरांगेत असलेल्या व्हेरिओव्हकिना गुहेला जातो. या पर्वत रांगेत दोन अशा गुहा आहेत, त्‍या एकमेकांना कडक टक्कर देतात. या दोन्ही गुहांबद्दलची माहितीही रंजक आहे. व्हेरिओव्हकिना गुहेची खोली सुमारे २,२१२ मीटर (७,२५७ फूट) हे अंतर दुबईच्या बुर्ज खलिफा इमारतीपेक्षा जवळपास अडीच पटीने जास्त खोल आहे.

ही गुहा जॉर्जिया देशातील अबखाझिया प्रांतात आहे. २०१८ मध्ये रशियन गिर्यारोहक आणि संशोधकांच्या एका पथकाने या गुहेच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत (ज्याला 'कॅप्टन नेमो लेक' म्हणतात) पोहोचून या खोलीची नोंद केली. सध्या अधिकृतपणे हीच जगातील सर्वात खोल गुहा आहे. कक्र जगातील दुसर्‍या क्रमांकाची असलेल्‍या क्रुबेरा गुहेची खोली सुमारे २,१९७ मीटर (७,२०७ फूट) आहे. ही गुहादेखील व्हेरिओव्हकिना गुहेप्रमाणेच जॉर्जियाच्या अराबिका पर्वतरांगेतच आहे.

२०१८ च्या आधी कित्येक वर्षे 'क्रुबेरा' हीच जगातील सर्वात खोल गुहा म्हणून ओळखली जात होती. २००४ मध्ये २,००० मीटरपेक्षा जास्त खोली पार करणारी ही मानवी इतिहासातील पहिली गुहा ठरली होती. मात्र, व्हेरिओव्हकिना गुहेच्या नव्या शोधानंतर क्रुबेरा गुहा दुसऱ्या क्रमांकावर गेली. या पर्वतरांगेतील चुनखडीचे खडक लाखो वर्षांपासून पाण्याच्या प्रवाहामुळे विरघळत गेल्याने जमिनीखाली एवढी अथांग आणि खोल भुयारी जाळी तयार झाली आहे. यामध्ये उतरणे हे एव्हरेस्ट सर करण्याइतकेच किंवा त्याहूनही अधिक आव्हानात्मक आणि धोकादायक मानले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news