जहाज नव्हे; तरंगते शहरच!

जहाज नव्हे; तरंगते शहरच!

पॅरिस : जगातील सर्वात मोठ्या क्रूझ शिपमध्ये 'ओअ‍ॅसिस ऑफ द सीज', 'हार्मनी ऑफ द सीज' अशा काही जहाजांचा समावेश होतो. त्यापैकी 'हार्मनी ऑफ द सीज' हे जहाज एक लाख 20 हजार टन वजनाचे असून ते एखाद्या तरंगत्या शहरासारखेच आहे.

या जहाजाची रुंदी 66 मीटर म्हणजे 217 फूट आहे. एक ड्रॉईंग रूमची रुंदी सरासरी 12 फूट असते. याचा अर्थ तुमचे 17 ते 18 ड्रॉईंग रूम्स मावतील एवढी रुंदी या जहाजाची आहे. 'हार्मनी'ची लांबी 361 मीटर आहे. फुटबॉल मैदानाची लांबी 360 मीटर असते. यावरून तुम्ही या जहाजाच्या लांबीची कल्पना करू शकता. फ्रान्सच्या अटलांटिकच्या किनार्‍यावर 'हार्मनी' तयार केले गेले. जेव्हा 'हार्मनी ऑफ द सीज' फ्रान्सच्या साँ नजेएरहून रवाना झाले, तेव्हा पाहण्यासाठी तब्बल 70 हजारांहून अधिक लोकांची उपस्थिती होती. अनेक अर्थांनी पाहिले तर 'हार्मनी ऑफ द सीज' एखाद्या तरंगत्या शहरासारखेच वाटते.

सुमारे एक अब्ज डॉलर्स म्हणजेच 66 कोटी रुपये खर्च करून हे महाकाय जहाज तयार केलं गेलंय. जहाजरूपी या तरंगत्या शहरात 16 मजले आहेत. यामध्ये 6 हजार 360 प्रवाशांना राहण्याची व्यवस्था असून, प्रवाशांच्या देखभालीसाठी 2 हजार 100 क्रू मेंबर्स आहेत. शिवाय, 40 कि.मी. प्रतितास असा या जहाजाचा वेग असून, यात 10 स्टोरी स्लाईड, ट्रिओ ऑफ वॉटर स्लाईडस्, किडस् वॉटरपार्क, सेंट्रल पार्क, बोर्डवॉक, पूल एंड स्पोर्टस् जोन, सी स्पा अँड फिटनेस सेंटर, एंटरटेन्मेंट प्लेस, यूथ जोन या सुविधाही देण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news