सर्वात लांब केसांची महिला

सर्वात लांब केसांची महिला
Published on
Updated on

बीजिंग : स्त्रीसौंदर्याचे एक लक्षण म्हणजे सुंदर व लांबसडक केस. जगभरात अनेक 'सुकेशिनी' असतात. त्यापैकी काहींचे केस तर नवे नवे विक्रम घडवणारेच आहेत. जगातील सर्वात लांब केस असणारी महिला म्हणून झी क्युपिंग या चीनमधील महिलेची नोंद गिनिज बुकमध्ये आहे. या महिलेच्या केसांची लांबी तब्बल 5.627 मीटर म्हणजेच 18 फूट 5.54 इंच आहे. तिच्या केसांची ही लांबी 8 मे 2004 मध्ये मोजण्यात आली होती.

झी हीने 1973 मध्ये वयाच्या तेराव्या वर्षांपासून आपले केस वाढवण्यास सुरुवात केली होती. तिला या लांबसडक केसांचा त्रास होत नाही. या लांब केसांची आपल्याला सवय झाली आहे असे ती सांगते. मात्र इतके लांब केस असल्यावर तुम्हाला संयम आणि सहनशीलताही हवी, असे ती आवर्जून सांगते. तिच्या केसांची लांबी एखाद्या जिराफाच्या उंचीइतकी आहे. या केसांची ती अर्थातच नीट काळजी घेत असते. इतके लांब केस सांभाळणे ही सहजसोपी गोष्ट नक्कीच नाही. मात्र या केसांमुळेच तिला जगप्रसिध्दीही मिळालेली आहे. त्यामुळे या केशसंभाराचा तिला अभिमानच आहे!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news