woman kissing crocodile | पदवी मिळाल्यावर ‘ती’ भेटली मगरीला!

woman kissing crocodile |
woman kissing crocodile | पदवी मिळाल्यावर ‘ती’ भेटली मगरीला!
Published on
Updated on

न्यूयॉर्क : पदवीधर झाल्यावर विद्यार्थी अनेकदा पालकांसोबत किंवा मित्रांसोबत फोटोशूट करतात.पण अमेरिकेच्या एका मुलीने ग्रॅज्युएट झाल्यावर अनेकांना थक्कच केले आहे. पदवी मिळाल्याच्या आनंदात या महिलेने असे काही केले की,अनेकांच्या पायाखालची जमिनच सरकली. 14 फूट लांब मगरीच्या जबड्याजवळ जाऊन तिने फक्त पोजच दिली नाही, तर त्या मगरीला किसही केले. या मुलीचा मगरीसोबतचा हा खतरनाक फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मॅकनीस स्टेट यूनिव्हर्सिटीच्या कॅट डेलीने तिची पदवी संपादन केली. त्यानंतर तिने असे काही भन्नाट करायचा विचार केला की, जे अनेकांच्या लक्षात राहिल. तिने नेव्ही ब्लू गाऊन घालून डोक्यावर ग्रॅज्युएशन कॅप घातली. त्यानंतर ती थेट पाण्यात उतरली आणि 14 फूट लांब मगरीजवळ गेली. हद्द तर तेव्हाच झाली, जेव्हा तिने मगरीच्या उघडलेल्या जबड्यावर किस केले. खरेतर कॅट ट्रेनी नाहीय. ती तिच्या होणार्‍या नवर्‍यासोबत ‘गेटर कंट्री’नावाचे रेस्क्यू पार्क चालवते. ती 7 वर्षांच्या वयापासूनच जंगली प्राण्यांमध्ये खेळली आहे.

फोटोशूट दरम्यान फोटोग्राफरला मगरीपेक्षा जास्त भीती एका विषारी सापाची वाटत होती. ज्याला कॅटने एका खेळण्यासारखे पकडले होते.त्यांना लोकांना फक्त हे सांगायचं आहे की, मगरींबाबत चुकीची माहिती पसरवली जाते. मगरी तेवढ्या आक्रमक नसतात. हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पण राहत्या घरी किंवा इतर ठिकाणी अशाप्रकारे मगरींना पकडण्याचा प्रयत्न करू नका. कॅट मगरींना हाताळण्याच्या बाबतीत खूप अनुभवी आहे. ग्रॅज्युएशन फोटोशूटसाठी ही आतापर्यंतची सर्वात जीवघेणी आणि अनोखी पद्धत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news