

लॉस एंजिल्स : सोशल मीडियावर सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत राहिला आहे, ज्यात इमारतीवर लीलया चढून जाणारी व्यक्ती दिसून येते आहे आणि त्याला शहरी टारझन असेही म्हटले जात आहे. मात्र, फरक इतकाच आहे की, ही व्यक्ती जंगलात नव्हे तर शहरात राहते. आता त्याच्या सवयी या जंगली टार्झनसारख्या आहेत आणि तो इमारतीवरदेखील झाडावर चढल्याप्रमाणेच चढताना दिसून येतो आहे.
हा शहरी टारझन कधीही जंगलात रहात नाही. तो नेहमी शहरातच राहतो. त्याचे वागणे मात्र टाझरनसारखेच आहे. आता तो अपार्टमेंटमध्ये राहतो. पण, पायर्यांचा कधीही उपयोग करत नाही. वरच्या मजल्यावर जायचे असेल तर तो बाल्कनीवरून फांद्यावर चढल्याप्रमाणे सरसर वर चढत जातो.
या शहरी टार्झनचे नाव मॅथ्यू जँग असे आहे. त्याचे लॉस एंजिल्समध्ये एका अपार्टमेंटमध्ये वास्तव्य आहे. पण, त्याचे इमारतीच्या बाल्कनीत चढणे-उतरणे मात्र सर्वांसाठीच थक्क करणारे असते. स्पोर्टस्पर्सन अशी ओळख सांगणार्या मॅथ्यू जँगचे सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स आहेत. त्यावर अपलोड केलेल्या सर्व व्हिडीओत तो अपार्टमेंटमध्येही उड्या मारत ये-जा करत असल्याचे दिसून येते.