जपानी पुरुष दाढी का नाही ठेवत?

जपानी पुरुष दाढी का नाही ठेवत?

टोकियो : बहुसंख्य जपानी पुरुष 'क्लीन शेव्ह' असल्याचे दिसतात. तेथील पुरुष दाढी का ठेवत नाहीत, असा प्रश्न अनेकांना पडतो. याबाबत काही समजही प्रचलित आहेत. मात्र जपानी पुरुषांकडून दाढी न ठेवण्यामागेही एक ठोस कारण आहे.

जपानमधील मोठ-मोठ्या सेलिब्रिटी ही नेहमीच क्लीन शेव्हमध्ये दिसतात. जपानी पुरुषांना दाढी येतंच नाही असाही एक गैरसमज आहे. खरे तर जपानी पुरुषही जगातील इतर पुरुषांप्रमाणे दाढी वाढवू शकतात. मात्र, अन्य पुरुषांच्या तुलनेत त्यांच्या चेहर्‍यावर अतिशय कमी केस येतात. यामागील एक कारण त्यांच्या जनुकांमध्ये लपलेले आहे. जपानी पुरुषांच्या चेहर्‍यावर 'इडीएआर' नावाच्या विशिष्ट जनुकामुळे कमी केस येतात. ही अनुवंशिकता एका पिढीतून दुसर्‍या पिढीत जाते.

टेस्टोस्टेरॉन नावाच्या हार्मोनमुळं चेहर्‍यावर दाढी आणि मिशा येतात. ज्या पुरुषामध्ये टेस्टोस्टेरॉनचा स्तर जास्त असते, अशा पुरुषांच्या शरीरावर केसांची वाढ वेगाने होत असते. दाढी असणे हे सक्रिय टेस्टोस्टेरॉनचे लक्षण मानले जाते. 19-38 वर्षांच्या मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉनचा स्तर 264-916 नॅनोग्राम प्रति डेसीलीटर (एनजी/डीएल) पर्यंत असावे, असं म्हटलं जाते.

मात्र पूर्व आशियातील अनेक पुरुषांमध्ये हा स्तर तुलनेने कमी असतो. अर्थात जपानी मुलांना व पुरुषांनाही दाढी येते मात्र तुलनेने कमी प्रमाणात येते. अनेक देशांमध्ये दाढी व मिशा ठेवण्याचा पुरुषत्वाशी संबंध मानला जातो. मात्र, जपानी लोक दाढीचा संबंध आळशीपणा आणि अस्वच्छतेशीही जोडतात! याच कारणामुळं जपानी लोक दाढी व मिशा ठेवणे पसंत करत नाहीत. त्यांच्या मान्यतेनुसार, डोळ्यांची सुंदरता ही सर्वश्रेष्ठ आहे आणि हेच कारण आहे की जपानी लोक अजिबात दाढी वाढवत नाहीत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news