Black Rice | देशात कुठे पिकतो काळा तांदूळ?

Black Rice |
Black Rice | देशात कुठे पिकतो काळा तांदूळ?
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : देशात तांदुळाचे अनेक प्रकारचे वाण पहायला मिळते. जेव्हा काळ्या तांदुळाचा विषय येतो त्यावेळी चक-हाओचा उल्लेख आवर्जून होतो. हा काळा तांदूळ मणिपूरमध्ये पिकवला जातो. स्थानिक स्तरावर त्याला ‘ब्लॅक एरोमॅटिक राईस’देखील म्हटले जाते.

ईशान्य भारतातील मणिपूर राज्य हे काळ्या तांदळाचे मुख्य ठिकाण आहे. चक-हाओ तांदुळाची ओळख एका जिल्ह्याने नव्हे तर मणिपूर राज्याशीच संबंधित आहे. याचा जीआय रेकॉर्डदेखील राज्यस्तरावर नोंदला गेला आहे. भौगोलिक क्षेत्रात मणिपूरसह नागालँडमध्ये देखील काळ्या तांदळाचे उत्पादन होते. मात्र, मणिपूरला याचा गड मानले जाते. आता प्रश्न हा आहे की, या तांदुळाला काळा रंग कसा काय येतो आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये हा तांदूळ जास्त का पिकतो आणि त्याची वैशिष्ट्ये काय?

चक-हाओचा याचा काळा रंग याच्या नैसर्गिक पिगमेंट एंथोसायनिनमुळे होतो. एंथोसायनिन हे पिंगमेंट आहे जे अनेक प्रकारच्या रोपात आढळते, आणि याला लाल, जांभळा आणि निळा रंग देते. हे पिगमेंट तांदळाचा रंग गडद करते. मणिपुरात चक-हाओचा वापर खास सणासुदीत केला जातो. रोजच्या जेवणाऐवजी हा तांदूळ खास सणासुदीच्या थाळीचा भाग असतो. याचा सुवास आणि रंग अन्य तांदळापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे सर्वसाधारण तांदळापेक्षा हा भिन्न आहे. चक-हाओला जीआय टॅग प्रदान केलेला आहे. जीआय टॅगचा अर्थ असा आहे की, त्याचे उत्पादन करणाऱ्या प्रदेशाला स्वतःच्या नावावर आणि या तांदळाच्या ओळखीवर हक्क आहे.

यामुळे बनावट किंवा आयात केलेला तांदूळ चक-हाओ म्हणून विकणे कठीण होते आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीला मान्यता मिळते. जगभरातील ८० हून अधिक देश भारतातून काळा तांदूळ आयात करतात. अमेरिका हा सर्वात मोठा खरेदीदार आहे. याशिवाय, युके, युरोप, मध्य पूर्व, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, सिंगापूर, मलेशिया, दक्षिण कोरिया, उत्तर अमेरिका आणि अनेक आफ्रिकन देशांनाही हा काळा तांदूळ विकला जातो. काळा तांदूळ हे मणिपूरचे पारंपरिक पीक असून, मैतेई समाजाच्या सामाजिक-सांस्कृतिक प्रथांमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार, हा तांदूळ राजदरबारातील मेजवान्या आणि धार्मिक समारंभांमध्ये वाढला जात असे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news