‘The Great Khali’साठी ज्योती बनली जणू बाहुली!

‘The Great Khali’साठी ज्योती बनली जणू बाहुली!

नवी दिल्ली : 'जगातील सर्वात कमी उंचीची महिला' अशी नागपूरच्या ज्योती आमगे हिची ओळख आहे, तर जगातील एक शक्तिशाली माणूस म्हणून'द ग्रेट खली'ला ओळखले जाते. खलीची उंची तब्बल 7 फूट 2 इंच आहे. नुकतीच या दोघांची भेट झाली आणि छोट्याशा बालिकेसारख्या दिसणार्‍या ज्योतीला खलीने एखाद्या बाहुलीसारखे उचलले आणि फिरवले!

या दोघांच्या भेटीचा व्हिडीओ स्वतः खलीनेच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अर्थातच हा व्हिडीओ व्हायरलही झाला. खलीच्या तळहातात ज्योती सहजपणे सामावून गेली होती. आपल्या तळहाताने तिला उचलून खलीने हवेत फिरवले. खली व्हिडीओत म्हणत आहे की, 'हम आपको पुणे पहूंचा देंगे'. ज्योती यावेळी हसत असताना दिसून येते. या व्हिडीओला आतापर्यंत 15 लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच व्हिडीओला 44 दशलक्षपेक्षाही अधिक व्ह्यूजही मिळाले आहेत.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी आपापल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. बहुतांश युजर्सनी म्हटले की, खली एखादे खेळणे घेऊन त्याच्याशी खेळत असल्यासारखे वाटते! खरे तर ज्योतीचे वय सध्या 30 वर्षांचे आहे. तिची उंची 62.8 सेंटीमीटर म्हणजेच 2 फूट 3/4 इंच इतकी आहे. 16 डिसेंबर 2011 या तिच्या अठराव्या वाढदिवशी तिच्या नावाची नोंद गिनिज बुकमध्ये झाली होती. 'प्रीमॉर्डियल डॉर्फिजम' या विकारामुळे तिची उंची खुंटली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news