जेव्हा मॉलमध्ये शिरते महाकाय मगर!

जेव्हा मॉलमध्ये शिरते महाकाय मगर!

फ्लोरिडा : एखाद्या मेट्रो शहरात, प्रचंड वर्दळीच्या ठिकाणी एखादी महाकाय मगर अचानक प्रकट होईल, याची कोणी अपेक्षाही करणार नाही. पण, फ्लोरिडात चक्क असेच झाले असून दिवसाढवळ्या वर्दळीच्या एका मॉलमध्ये मगरीच्या एन्ट्रीने उपस्थितांची भंबेरी उडाली नसते तरच नवल होते. फ्लोरिडातील कोकोनट पॉईंट या मॉलमध्ये ही अजब घटना घडली.

आता इतक्या वर्दळीच्या ठिकाणी ही मगर पोहोचली तरी कशी, याचा अभ्यास केला असता असे लक्षात आले की, या मॉलच्या मागेच एक नदी आहे आणि त्यामुळे ही मगर त्या नदीतून आली असावी, अशी शक्यता वर्तवली जाते आहे. ही मगर मागील दरवाजाने मॉलमध्ये शिरली असावी, असा व्यवस्थापनाचा अंदाज आहे.

ही मगर वरच्या मजल्यावर सरसावत असल्याचे एका ग्राहकाने पाहिले आणि त्यानंतर काही क्षणातच उपस्थितांमध्ये गोंधळ सुरू झाला. प्रसंगावधान राखत काहींनी आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क साधला आणि मगरीला मॉलमधून ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. पोलिसांचे एक पथक वन विभागातील बचाव पथकासह दाखल झाले आणि सर्वप्रथम मॉलमध्ये आत असलेल्या ग्राहकांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मगर जेरबंद करण्यास सुरुवात केली गेली.

12 फूट उंचीची ही महाकाय मगर पकडणे अर्थातच आव्हानात्मक होते. पण, महत्प्रयासानंतर त्यात यश आले आणि जवळपास पाऊण तासानंतर त्या मगरीला पकडून सुरक्षित स्थळी सोडण्यात आले. या मगरीच्या बचावाचा एक व्हिडीओ आता सोशल नेटवर्कवर व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news