आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक कोसळले तर?

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक कोसळले तर?

वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सध्या पृथ्वीच्या खालील स्तरातील कक्षेत फिरत आहे. मात्र, हे स्पेस स्टेशन पृथ्वीवर कोसळले तर मोठा विनाश होईल. अर्थात ते सुरक्षितपणे प्रशांत महासागरात पाडण्याच्या प्रक्रियेचा 'नासा'च्या संशोधकांनी खुलासा केला आहे.

पृथ्वीपासून 400 कि.मी. उंचीवर हे स्पेस स्टेशन अंतराळात फिरत आहे. अमेरिका, रशिया, जपान, युरोपसह 15 देशांच्या अंतराळ संस्थांनी मिळून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची स्थापन केली आहे. 'नासा'ने आता हे स्थानक नष्ट अर्थात डीआर्बिट करण्याचा निर्णय घेतला आहे. एका स्पेसक्राफ्टच्या मदतीने हे स्पेस स्टेशन नष्ट करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. मात्र, या प्रक्रितेदरम्यान हे अंतराळ स्थानक पृथ्वीवर कोसळण्याचा देखील धोका आहे. कारण, हे स्पेस स्टेशन अंतराळात स्थापित करणे आव्हानात्मक होते त्याचप्रमाणे स्पेस स्टेश डीआर्बिट करणे तितकेच धोकादायक आहे. ते डीऑर्बिट करण्याच्या प्रक्रियेला 'स्पेस टग' असे म्हटले जाते.

1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात या स्थानकाची निर्मिती करण्यात आली. त्याचा कार्यकाळ हा 15 वर्षांचा होता. प्रत्यक्षात मात्र, गेली 24 वर्षे ते कक्षेत कार्यरत आहे. अशा स्थितीत हे नियंत्रणाबाहेर गेल्यास धोकादायक ठरू शकते. यामुळे ते सुनियोजित पद्धतीने डीऑर्बिट करणे गरजेचे आहे. 2031 पर्यंत ते डीऑर्बिट करण्याचे उद्दिष्ट आहे. स्थानक डीऑर्बिट करणे अत्यंत धोकादायक आहे. छोटीशी चूक देखील महागात पडू शकतो. या दरम्यान ते पृथ्वीवर कोसळले तर मोठा विनाश होऊ शकतो.

अंतराळ स्थानक नष्ट करण्यासाठी खास अंतराळयान तयार केले जाणार आहे. 'यूएस डीऑर्बिट व्हेईकल (यूएसडीव्ही) असे या स्पेसक्राफ्टचे नाव असणार आहे. यासाठी विशेष बजेटची तरतूद करण्यात आली आहे. या यानाच्या मदतीने स्पेस स्टेशन उद्ध्वस्त करून योग्य विल्हेवाट लावली जाणार आहे. निर्मनुष्य प्रदेश अशी ओळख असलेल्या दक्षिण प्रशांत महासागरात हे स्पेस स्टेशन पाडून ते नष्ट करण्यात येईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news