शनीच्या चंद्रावर पाण्याच्या वाफेचे ढग

शनीच्या चंद्रावर पाण्याच्या वाफेचे ढग
Published on
Updated on

वॉशिंग्टन : शनीचे शंभरपेक्षाही अधिक चंद्र आहेत. त्यामध्ये टायटन, एन्सिलाडससारख्या काही चंद्रांकडे खगोलशास्त्रज्ञांचे विशेष लक्ष असते. आता खगोलशास्त्रज्ञांनी एन्सिलाडस या बर्फाळ चंद्रावर पाण्याच्या वाफेचे जणू काही मोठा पिसारा असल्यासारखे ढग शोधून काढले आहेत. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या सहाय्याने हे संशोधन करण्यात आले.

504 किलोमीटर रुंदीचा हा चंद्र त्याच्यावरील बर्फाच्या आच्छादनामुळे ओळखला जातो. मात्र, त्यावरील ही पाण्याची वाफही मोठीच आहे. ती ब्रिटनपासून जपानपर्यंतच्या अंतराइतक्या जागेत म्हणजेच सुमारे 9600 किलोमीटर जागेत फैलावलेली आहे. या चंद्रावर बर्फाच्या स्तराखाली खार्‍या पाण्याचे महासागर असावेत असे संशोधकांना वाटते. पाण्याच्या अस्तित्वामुळे तिथे जीवसृष्टीला अनुकूल अशा काही मूलभूत गोष्टीही असाव्यात अशीही शक्यता संशोधकांना वाटते.

'नासा'च्या 2004 ते 2017 या काळातील कॅसिनी मोहिमेत शनी व त्याच्या विविध चंद्रांची तपशीलवार माहिती गोळा करण्यात आली होती. त्यावेळी 'कॅसिनी' यान एन्सिलाडसजवळूनही अनेक वेळा गेले होते. मात्र, त्यावेळी तेथील जीवसृष्टीचे थेट संकेत मिळाले नव्हते. आता जेम्स वेब अंतराळ दुर्बिणीने तेथील पाण्याच्या वाफेचा हा मोठा पिसारा शोधला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news