जगभरातील सरोवरांमधून ‘गायब’ होत आहे पाणी!

जगभरातील सरोवरांमधून ‘गायब’ होत आहे पाणी!

Published on

वॉशिंग्टन : हवामान बदल, जागतिक तापमानवाढ यांचे अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत. या कारणांमुळे जगभरातील मोठी सरोवरही कोरडी पडू लागली असल्याचे चित्र आहे. एका संशोधनानुसार 1990 नंतर दरवर्षी कोट्यवधी गॅलन पाणी आटत चालले आहे. वैज्ञानिकांनी जगातील सुमारे 2 हजार सर्वात मोठ्या सरोवरांचे निरीक्षण केल्यानंतर त्यांना असे दिसून आले की दरवर्षी त्यांचे सुमारे 215 खर्व लिटर पाणी कमी होत आहे.

1992 ते 2020 नंतर जगभरातील सरोवरांमधील पाणी मोठ्या प्रमाणात गायब झालेले आहे. अमेरिकेतील सर्वात मोठे सरोवर असलेल्या नेवाडाच्या लेक मीडइतक्या आकाराच्या 17 सरोवरांमधील पाण्याइतके पाणी या काळात नष्ट झाले आहे. हे तितकेच पाणी आहे जितके 2015 या वर्षामध्ये अमेरिकेने वापर केला होता. ज्या सरोवरांच्या परिसरात यापूर्वी चांगला पाऊस होत असे तिथे पर्जन्यमान घटल्याचे दिसून आले आहे. तापमान वाढल्यामुळे पाण्याची वेगाने बाष्प होत चालले आहे.

तसेच शेती, वीजनिर्मिती आणि पिण्यासाठीही सरोवरांमधील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. 'सायन्स' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की अनियमित पाऊस आणि नद्यांचे पात्र बदलणे यामुळेही सरोवरांमधील पाणी कमी होत आहे. इराणमधील उर्मिया सरोवर कोरडे पडण्याचे हेच मुख्य कारण आहे. एका संशोधनानुसार या सरोवरातून दरवर्षी 10.5 खर्व लिटर पाणी कमी होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news