विक्रमादित्य वैदिक घड्याळाविषयी…

विक्रमादित्य वैदिक घड्याळाविषयी…

Published on

मध्य प्रदेशातील उज्जैन शहर प्राचीन काळापासूनच प्रसिद्ध आहे. भगवान श्रीकृष्णांचे गुरू सांदिपनी ऋषींचा आश्रम या क्षिप्रा नदी तीरावरच्या उज्जैन नगरीतच होता. 'अवंतिका' असेही एक नाव असलेल्या या शहरात कालिदासासारख्या संस्कृत कवी व नाटककारापासून ते वराहमिहीरसारख्या खगोलशास्त्रज्ञांपर्यंत अनेक रत्नांची खाणच आढळते. विक्रमादित्य राजाच्या या नगरीचे खगोलशास्त्राच्या द़ृष्टीने असलेले योगदान मोठेच आहे. गुरुवारी म्हणजे 29 फेब्रुवारी रोजी उज्जैनमध्ये विक्रमादित्य वैदिक घड्याळचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. जगातील हे असे पहिले घड्याळ असणार आहे जे वैदिक कालगणनेनुसार आहे व त्यामध्ये सर्वसामान्य घड्याळाप्रमाणे मिनिट आणि तासाचा काटा नसेल. शिवाय हे डिजिटलही असणार आहे. लक्षवेधी गोष्ट म्हणजे या घड्याळातील एक तास हा 60 मिनिटांचा नसणार आहे. चला तर जाणून घेऊया या घड्याळाविषयी…

कशी कळेल वेळ – या घड्याळात इटॅन्डर्ड टाईम आणि ग्रीनविच मीन टाईम सोबतच पंचांग आणि मुहूर्ताविषयी देखील माहिती मिळणार आहे.

48 मिनिटांचा एक तास – विक्रमादित्य वैदिक तास हा 48 मिनिटांचा असणार आहे. हे घड्याळ फक्त वेळ नाही तर मुहूर्त, ग्रहण तिथी, शुभ मुहूर्त, पर्व, उपवास, ग्रह-भद्रा स्थिती, योग, सण, सूर्य आणि चंद्र ग्रहणसोबत अनेक गोष्टींची माहिती देणार.

जगातील पहिलं वैदिक घड्याळ – जगात असं घड्याळ कुठेच नाही. उज्जैनमध्ये असलेल्या या घड्याळाची निर्मिती ही 85 फूट टॉवरवर करण्यात आली आहे. वैदिक माहिती देणार्‍या या घड्याळाला संपूर्ण डिजिटल बनवण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याचा एक अ‍ॅपदेखील लाँच करण्यात आला आहे.

तीस तासांचे घड्याळ – या तीस तासांच्या घड्याळात 24 तास नाही तर 30 तास असणार आहेत. हे घड्याळ सूर्योदयापासून सूर्यास्ता पर्यंतची सगळे वेळ दाखवणार आहे.

कोणी बनवलं हे घड्याळ – विक्रमादित्य वैदिक घड्याळ हे आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी बनवलं आहे. या घड्याळात तुम्हाला हवामानाविषयी देखील माहिती मिळेल.

इंटरनेट आणि जीपीएस कनेक्शन – विक्रमादित्य वैदिक घड्याळ इंटरनेट आणि जीपीएसशी जोडलेलं आहे. तर या घड्याळाच्या अ‍ॅपला कोणीही डाऊनलोड करू शकतं. वॉच टॉवर टेलिस्कोप देखील लावला आहे. हे घड्याळ देशातील सगळ्या प्रमुख मंदिरांशी जोडलेलं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news